सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मॅनेज केला. त्याचा अर्ज मागे घेताच उरलेल्या आठ जणांनी आपआपले नामांकन परत घेतले. पैशाचा खेळ झाला. सूरतची निवडणूक मॅच फिक्सिंगने जिंकली. मॅच फिक्सिंग हा गुन्हा ठरतो. अर्थात या कटात सहभागी सर्व गुन्हेगार ठरतात. निवडणूक आयोग गप्प आहे.
जगाला लोकशाही देणारा भारत. त्याची दिशा भरकटवली जाते. हे बघता, भाजपाला झाले तरी काय..! हा प्रश्न असंख्य भारतीयांच्या मनात आहे. जे काही घडतंय ते नितीमत्ता असणार्यांना रूचत नाही. मनाला अजिबात पटत नाही. लोकशाही रक्षक यंत्रणा कुचकामी ठरल्यात..! मतदानामुळे लोकशाही जिवंत आहे. त्या मतदाराला मतदानाची संधीच न देणे, तसे कट-कारस्थान रचणे, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा प्राण; हा प्राणच काढून टाकण्याची खेळी आहे. सूरत, इंदौर, खजुराहो, चंडीगडच्या घटना बर्याच बोलक्या आहेत. ४०० पारचा नारा द्यावयाचा. त्यासाठी बनवाबनवीचा जांगडगुत्ता कशासाठी, हा प्रश्न आहे. घटनाकाराने जातपात, लिंगभेद, वर्गभेद असा भेदाभेद केला नाही. राजा आणि रंकाला मतदानाचा समान अधिकार दिला. दोघांच्या मतांचे मूल्य समान आहे. याचा अभिमान आहे. त्या मतदारराजाला मतदानाची संधीच द्यावयाची नाही. आता उमेदवारच ठरवू लागले, मतदान हवे की नको.
सरकारी ठेके मिळविण्यास ठेकेदार साखळी करतात, असे ऐकले होते. आता मतदान हवे, की नकोसाठी उमेदवार साखळी बनवू लागलेत. हा खेळ निष्ठूर आहे. भारताने सत्तर वर्षे लोकशाही मूल्य जपले. त्याला अलीकडे सुरूंग लावणे सुरू आहे. असा प्रयत्न सुरतमध्ये झाला. हे लोण मध्यप्रदेशात पोहचले. इंदौर लोकसभा मतदारसंघात तमाशा झाला. भाजपच्या किती नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली? मोदी-शहा बोलले नाहीत. आपले नागपुरी नितीनबाबू तरी बोलले का..! यावर माध्यमांनी नेत्यांना प्रश्न तरी विचारले काय..! सारीच उत्तरे नाही आहेत. हे बघता म्हणावयासे वाटते कुठे नेत आहात माझ्या भारत देशाला?सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मॅनेज केला. त्याचा अर्ज मागे घेताच उरलेल्या आठ जणांनी आपआपले नामांकन परत घेतले. पैशाचा खेळ झाला. सूरतची निवडणूक मॅच फिक्सिंगने जिंकली. मॅच फिक्सिंग हा गुन्हा ठरतो. अर्थात या कटात सहभागी सर्व गुन्हेगार ठरतात. निवडणूक आयोग गप्प आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकाराची निंदा केली. बराच गदारोळ केला. त्याची कोणी दखल घेतली नाही. या मतदारसंघातील सुमारे साडे सोळा लाख मतदारांना त्यांच्या मतांच्या अधिकारापासून वंचित केले. सोबतच नोटा मतदानाचा अधिकार हिरावला. भारतीय लोकशाहीत मतदारांना मत नकाराचासुद्धा अधिकार आहे. त्यात रिंगणातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य नाही, त्यासाठी ईव्हीएममध्ये नकारार्थी मत देण्याची सोय आहे. गुलाबी बटन नोटाची होय. सुरत प्रकरणाची पुनरावृत्ती भाजपवाल्यांनी इंदौरमध्ये केली. हा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला. काँग्रेस उमेदवार अक्षय कांति बम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर १७ वर्षे जुने एक प्रकरण बाहेर काढले. त्या प्रकरणात अक्षय आणि त्यांचे वडील दोघांचा न्यायालयाने अटक वॉरंट काढला. अटकेच्या भीतीने उमेदवार बम यांनी निवडणुकीतून माघार घेतली. काँग्रेस उमेदवार मैदानातून बाद होताच काँग्रेसने जोमाने नोटाचा प्रचार सुरू केला. नोटाला मतदान करा. असा प्रचार इतिहासात राष्ट्रीय पक्षाकडून पहिल्यांदा घडला. त्याची सुरुवात इंदौरमधून झाली. या प्रचाराने बदनामीचा चिखल अंगावर उडू लागला. उमेदवारासह अनेक नेते चिखलाने माखले. त्यावर सुमित्रा महाजन यांनी जाहीर विधान केले. मला अनेक फोन आले. नोटाचे बटन दाबणार असे सांगितले. या विधानाने खळबळ माजली. लगेच भाजप
कार्यालयात बैठक बोलावून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाहीत असेही घडू शकते. या अगोदर असे प्रकार पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात घडले. त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या. त्यात ममता बॅनर्जी आणि योगी आदित्यनाथ यांच्या खेळी होत्या. दोन्ही पक्षांनी एक-दुसर्यांंवर बरेच आरोप केले. या प्रकाराकडे भारतीय मतदारांनी दुर्लक्ष केले. तो प्रकार संसदेच्या निवडणुकीत येईल असे कोणाला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. ते प्रकार आता दिसू लागलेत. सुरत पाठोपाठ इंदौरात घडले. इंदौरमध्ये काँग्रेस आक्रमक आहे. नोटाची गुलाबी बटन दाबा असे टॅक्सी, ऑटो व शहरभर पोस्टर लागले. त्यानी भाजपवाल्यांची झोप उडाली आहे. न्यायालयाच्या अटक वॉरट नंतरसुद्धा अद्याप अक्षय बम मोकळे आहेत. हे कसे काय, हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. खजुराहो लोकसभा मतदारसंघात सपाच्या उमेदवार मिरा यादव होत्या. त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले.
आता इंडिया आघाडीने फॉर्वर्ड ब्लॉकचे उमेदवार आर.बी. प्रजापती यांना उमेदवार घोषित केले. ते सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. या मतदारसंघात तिसर्या टप्प्यात मतदान झाले. ४ जूनला निकाल लागेल. या तीन मतदारसंघांत न्यायालयीन चौकशी व्हावी. सत्य बाहेर यावे. निकोप लोकशाहीसाठी हे आवश्यक आहे. चंडीगड महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकारीच मॅनेज झाल्याचे पुरावे आले होते. एक काळ होता. नागपुरात सुमतीताई सुकळीकर उमेदवार राहत. जनसंघाच्या काळापासून त्या सातत्याने पराभूत झाल्या. असे अनेक उमेदवार असत. त्यांनी कधीच गैरप्रकार केले नाही. त्यांची व्र्ाâांक्रीट म्यूरल चौकात दिमाखात आहेत. तो काळ अन् आजचा भाजपचा काळ. मोठी तफावत दिसते. कालपर्यंत भाजपवाले नितीमत्तेच्या गप्पा मारीत होते. ते सुरत, इंदौर, खजुराहो, चंडीगडवर मौन आहेत!
भूपेंद्र गणवीर
९८३४२४५७६८
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर