पुसद प्रतिनिधी– पुसद शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागाच्या प्रशासनाकडून नागरिकांना नागरी सुविधा देण्यामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. विशेष करून शहरातील अतिक्रमण, शहरातील अंतर्गत व राज्य मार्गावरील रस्ते विकास, गुन्हेगारी, चोरटी रेती , गिटटी मुरूम लवकर यासह अवैध प्रवासी वाहने विना कागदपत्र सुसाट चालत असलेली प्रवासी ऑटो रस्त्यावरच भरल्या जात असलेल्या लांब पडल्याच्या व जवळच्या पल्याच्या ट्रॅव्हल्स व अर्धवट रस्त्याची सुरू असलेली कामे या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी, वादविवाद अपघाताच्या घटना, अनेकांचा बळी अनेक जायबंदी तरीही कोणत्याही विभागाच्या प्रशासनाला हा प्रश्न गांभीर्याने सोडवावा असं वाटलं नाही. अनेक अधिकाऱ्यांनी आयएएस आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या.
अनेकांनी तर शहर पालक म्हणून दत्तक घेतले होते. मात्र त्यांच्या बदल्या झाल्यात. अर्थातच आपण जेवढा वेळ खुर्चीवर आहो तोवर नागरिकांना भूलथापा द्यायच्या याचा अर्थ असाच निघतो! पुसद शहरामध्ये विशेष करून आता राज्य परिवहन प्रादेशिक अधिकाऱ्यांनीच , अवैध प्रवासी वाहने, विनापरवाना विना कागदपत्र चालणारी ऑटो, रस्त्यावर भरली जात असलेली लांब पल्ल्याची जवळच्या पल्याची ट्रॅव्हल्स विनापरवाना चालत असलेल्या ट्रॅव्हल्स कुठलेही प्रवाशांसाठी सुरक्षित न बाळगता सुरू असलेल्या ट्रॅव्हल्स यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होणे गरजेचे आहे. पुसद मध्ये वाहतूक शाखा नावालाच उरलेली आहे.
ट्रॅफिक पोलीस यांचे कर्तव्य शहरातील वाहतूक नियंत्रण करणे असे असायला हवे. मात्र त्यांच्याकडे गृह विभागाने वाहतूक नियंत्रण काम सोडून केवळ दंडात्मक कामाची जबाबदारी दिल्याची चित्र सर्वत्र दिसून पडत आहे. वाहतूक शिपायांच्या समोर गाड्या अवैध प्रवासी वाहने भरल्या जातात. अधिकारी आराम करतात कागदपत्रे कारवाई दाखविण्यासाठी एक-दोन कारवाया दाखवीतात व वरिष्ठांचा समाधान करतात. याकरिता लोकप्रतिनिधी जागृत असायला हवा पुसदचे दुर्दैव दुसरे काय म्हणावं.