विचारांमध्ये राहणे आणि विचार करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. सजगपणे विचार करण्याची क्षमता नसल्यास अनावश्यक विचारांमध्ये गुंतण्याची व त्यामुळे जीवन दुःखमय होण्याची शक्यता निर्माण होते. तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये तर आता प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण किती सक्षम आहोत यापेक्षा आपल्या प्रश्न पडतात का आणि ते विचारता येतात का? ही क्षमता अधिक महत्त्वाची ठरत आहे, पुढेही ठरणार आहे.
‘आपल्या देशात ड्रायव्हिंग क्लासेसची सर्वात जास्त गरज आहे की पार्किंग क्लासेसची?’ या प्रश्नावर ‘पार्किंग क्लासेसची!’ असेच सहसा उत्तर येते. हे विचार करण्याच्या क्षमतेच्या कमकुवतपणाचे प्रतीक आहे. गाडीसुद्धा कुठे आणि कशी पार्क करावी इतके साधे न समजणारी माणसे आपल्या समाजात व आपल्या सभोवतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत; रस्त्यांवरून फिरताना आपल्या सहज लक्षात येत असेल. खरंतर याचा मुलांच्या जडणघडणीशी किंवा पालकत्वाशी काय संबंध? असा प्रश्न एखाद्या वाचकाला पडण्याची शक्यता आहे; परंतु विचार करण्याची क्षमता आणि जीवनाची गुणवत्ता या दोन गोष्टी वेगळ््या करता येत नाही, हे ज्या पालकांना कळते ते आपल्या मुलांना विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, मुलांना तशी संधी देतात. आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे, की विचार करण्याची संधी क्वचितच विद्यार्थ्यांना मिळते. अन्यथा ‘रेडिमेड’ उत्तरांचे पाठांतर केल्याने उतुंग यश मिळविण्याची संधी मात्र सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्याकडील बहुतांश परीक्षा आपली विचार करण्याची क्षमता काय आहे यापेक्षा आपल्या किती स्मरणात आहे यावर भर देणार्या आढळतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र स्मरणासाठी विविध ‘टूल्स’ उपलब्ध असतात; परंतु जीवनामध्ये स्मरणापेक्षा सजगपणे विचार करण्याच्या क्षमतेला अधिक महत्त्व आहे. म्हणूनच फक्त परीक्षेत किती गुण मिळविलेत यापेक्षा व्यक्ती किती विचारक्षम आहे यावरून त्याच्या जीवनाची उत्तुंगता निर्धारित होत असते, कारण विचार करण्याची क्षमता माणसाला निर्णयक्षम बनवते, चिंता व काळजीपासून मुक्त करते, आनंदी ठेवते.
विचारांमध्ये राहणे आणि विचार करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. सजगपणे विचार करण्याची क्षमता नसल्यास अनावश्यक विचारांमध्ये गुंतण्याची व त्यामुळे जीवन दुःखमय होण्याची शक्यता निर्माण होते. तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये तर आता प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण किती सक्षम आहोत यापेक्षा आपल्या प्रश्न पडतात का आणि ते विचारता येतात का? ही क्षमता अधिक महत्त्वाची ठरत आहे, पुढेही ठरणार आहे. प्रश्नच न पडण्याच्या मन:स्थितीमुळे विचार करण्याची क्षमता विकसित होत नाही. हल्ली तर पालकही मुलांना कमीतकमी श्रम पडावे, चांगले ‘नंबर्स’ यावेत म्हणून सगळे आयते देण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला हे माहीत आहे की बाजारातून खेळणे विकत आणून देण्यापेक्षा खेळणे बनविण्यात सर्जनशीलता आहे, बौद्धिक कुशलता आहे, कारण कोणत्याही गोष्टीच्या निर्माणाची प्रक्रिया ही मुलांना विचार करण्यासाठी चालना देते. मुलाने ते खेळणे बनविले किंवा ते बनविण्यात तो अपयशी ठरला यापेक्षा खेळणे बनविण्याच्या प्रक्रियेत त्याने सहभाग घेतला ही बाब त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत जास्त महत्त्वाची ठरते. आपले थोडेसे नुकसान झाले तरी चालेल, पण मुलांना घरामध्ये तर्हेतर्हेची कामे करू दिली पाहिजे. मन, बुद्धी आणि शरीराच्या उपयोगातूनच खरे शिक्षण होते, पाठांतराने फार तर अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे सुजाण पालकांनी आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना वसिहर करण्याची क्षमता विकसित व्हावी याकरिता सातत्याने संधी दिली पाहिजे.
मुलांशी संवाद साधताना त्यांना प्रश्न पडतील असा संवाद साधावा. त्यांच्या मनाला प्रश्न पाडावेत याकरिता प्रश्न विचारावेत. आपण मुलांना प्रश्न विचारतो पण आपले प्रश्न सहसा त्यांचे सामान्य ज्ञान किती आहे, हे तपासण्यासाठी असतात. प्रश्न असे हवेत की मुलांना त्यातून प्रतिप्रश्न निर्माण होतील. अगदी तुम्हाला पडणार्या प्रश्नांच्या संदर्भातसुद्धा तुम्ही मुल ५-६ वर्षाचे असले तरी प्रश्न विचारू शकता, उत्तर शोधण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकता. अगदी ट्रक आणि बस या दोहोंमध्ये काय फरक असतो? यासारखे सामान्य प्रश्नसुद्धा विचार करायला प्रवृत्त करतात. लहानांनाच नव्हे तर मोठ्यांनादेखील या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देताना मजा येईल आणि विचार क्षमता वाढविण्याची संधीही मिळेल. असे सामान्य प्रश्न पडता पडता मुलांना विवेकनिष्ठ विचार करण्याची सवय जडते, जगणे क्रियाशील होते. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे मुलांना विचार करण्याची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे सुजाण पालकत्व!
मनोज गोविंदवार
८८३०४७८७३५
पालक समुपदेशक, जळगाव