हल्लीच्या जीवनात टेन्शन, स्ट्रेस, बिझी, डिप्रेशन हे फार कॉमन शब्द झालेत. आणि यावर मात करण्यासाठी ‘मनःशांती’चा शोध सुरू झाला. आणि यासाठी विपश्यना, meditation classes लोक जॉईन करू लागलेत… मनःशांतीच्या शोधात दोन प्रकारांतील लोक मला आढळतात. एक करियर फोकस करणारी तरुण मुले- मुली आणि दुसरी ४० ते ५० मधील विवाहित वर्ग ज्यांना विवाहबाह्य संबंध अधिक जवळचे वाटतात.. एक काळ असा होता की आपल्या आधीच्या पिढीला मनःशांती शोधावी लागली नाही; पण हल्ली प्रत्येक डॉक्टर्स पेशंटला स्ट्रेस प्रâी राहायला सांगतात. काहींना ‘हायपर टेन्शन’साठी BP च्या गोळ्या तर काही कमी वयातच diabetic चे पेशंट बनतात. आजच्या पिढीला Health हीच wealth सांगायची वेळ आलीय. कारण त्यांना सुरुवातीपासूनच भरमसाठ पगार, वातानुकूल संकुलातील जॉब हवा असतो, शारीरिक कष्टाची कामं बहुतेकांना नको असतात. आणि ह्या सर्वांची हौस IT industries वाल्यांनी काही प्रमाणात पूर्ण केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आज तिशीतील मुले विविध व्याधींनी ग्रासलेली आढळत आहेत, हे समाजातील कटू सत्य आहे..
लहान वयात खिसा भरला असतो, भरमसाठ पगार मिळतो, चंगळ सुरू होते, बरीचशी व्यसनांच्या आहारी जातात, भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरमसाठ कर्ज घेतात, कर्ज फेडण्यासाठीच्या टेन्शनचा परिणाम स्वतःच्या प्रकृतीवर होतो, दुसर्या प्रकारात विवाहित स्त्री- पुरुष भावनेच्या भरात बाह्य संबंधात येतात आणि जसजसा तो संबंध वाढतो तसतशी त्यातील अपूर्वाई, ओढ कमी होऊन एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्याने किंवा झालेल्या चुकीची अथवा सामाजिक, कौटुंबिक जबाबदारीची जाणीव झाल्याने त्या नात्यात दुरावा निर्माण होऊन दोघांना मनस्ताप होऊ लागतो..खरतर भौतिक गरजा किंवा शारीरिक गरजा या कधीच पूर्ण होणार्या नसतात, त्या प्रमाणात आणल्या नाही, तर काही काळानंतर मनःशांतीची गरज भासते.
मनःशांती हा ह्यावरील कायमचा उपाय नव्हे. आता मनःशांती म्हणजे काय? मला वाटतं, जिथे मनाला शांती प्राप्त होते ते ठिकाण, मनाची प्रसन्नता म्हणजे मनःशांती.. पुष्कळदा आपण मनःशांतीच्या शोधात बाहेरील जगात भटकत असतो; पण ते जग बघून जास्त व्यथित होतो, दुःखी होतो. शेवटी हताश होऊन घरी परततो व जाणीव होते, की ज्याच्या शोधात होतो ते तर आपल्याला आपल्याच घरी लाभणार. घर, मग ते छोटे असो वा मोठे, मनःशांती ती घरीच लाभणार, फक्त घरातील वातावरण पोषक असावं. थोडक्यात काय तर जिथे पोषक वातावरण असेल तिथे मनःशांती प्राप्त होणार, जसे घर, देऊळ, नदी/समुद्र किनारा, निसर्गाच्या सान्निध्यात इत्यादी..
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जे आहे त्यात समाधान मानलं तर ना राहत टेन्शन ना ट्रेस..थोडक्यात ‘जो प्राप्त है वह पर्याप्त है‘ हा मंत्र सुखी जीवनासाठी the best.
तसं तर पूर्ण शांती मिळणं अशक्यच आहे, कारण पूर्ण शांती मिळाली किंवा प्रत्येकाचेच जर मन शांत असेल, समाधानी असेल तर पुष्कळांची रोजी रोटी जाईल, त्यांची निश्चिंत राहण्याची सवय वाढेल म्हणून ‘थोडा है थोडे की जरूरत है’ असं वागलं तरी मनःशांती लाभते..
आयुष्यात एका टप्प्यानंतर आपल्याला भौतिक गोष्टी, आणि हौशी- मौजी नकोशा वाटतात, flashi लाईफ नकोशी वाटते, ह्यानंतर हवी हवीशी वाटते ती शांती, मनःशांती. यासाठी पालकांनी आपल्या तरुण मुलांना जगाच्या स्पर्धेपासून दूर ठेवून घरात पोषक वातावरण ठेवलं पाहिजे म्हणजे मुलांचे तारुण्य ट्रेस प्रâी राहील..आणि प्रौढ वयातील लोकांनी आपल्या बेभान मनाला लगाम ठेवला, तर परलिंगी आकर्षणातून निर्माण होणार्या अशांततेला ते दूर ठेवू शकतील..शेवटी मनःशांती आपल्या आत आहे..स्वतःच्याच मनात…
वैशाली पाटील
९४२०३५०१७१