नागपूर(Nagpur):- विदर्भातील सर्वात मोठी वीज चोरीची कारवाई महावितरणच्या भरारी पथकाने रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिलवर (Rice mill) केली. येथे तब्बल १ कोटी २ लाख २३ हजार ८९४ रुपयांची वीजचोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले. या कारवाईनंतर औद्योतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. तर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी महावितरणनेताज राईस मिलवर कारवाई करीत तडजोडीअंती १३ लाख १० हजाराच दंड ठोठावला.
महावितरणची देवलापारमध्ये धडाकेबाज कारवाई
संपूर्ण विदर्भातएवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताज राईस मिलचे शफिक अंसारी याच्याविरोधात रामटेक पोलिस ठाण्यात (Ramtek Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, ३० डिसेंबर २०२४ रोजी महावितरणच्या नागपूर शहर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे हे दुपारी ४.४५ च्या सुमारास सहकारी सहायक अभियंता एन. आर. बागडे, सहयक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी व्ही. एस. बिसने, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. आर. यादव व मुमारी व्हि. के. बारलिंगे यांच्यासह देवलापार येथील ताज राईस मिलवर धडकले. यावेळी त्यांनी वीजपुरवठा व संच तपासणी केली असता वीज वापराची नोंद होण्यासाठी असलेल्या थ्री फेजच्या औद्योगिक वीजमीटरला आणि मीटर टर्मिनल कव्हरचे सिल तुटलेले होते. तसेच ही राईस मिल पूर्ण लोडवर सुरू असूनही वीजमीटरच्या डिस्प्लेवर कमी वापर दिसत होता.
विदर्भातील सर्वात मोठी वीज चोरी असल्याचा दावा
सदर वीजमीटरला येणारी इनकमिंग सर्विस केबलची (Incoming service cable) पाहणी करून या इनकमिंग केबलला जोडलेला ट्रान्सफॉर्मरच्या (Transformer) डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या जागी करंट मोजले असता सुरू असलेल्या वापराप्रमाणे करंट दिसत होता. सर्विस केबलला दोन ठिकाणी जोड दिसत होता. सर्विस केबल व मीटरच्या डिस्प्ले वरील करंटमध्ये तफावत दिसून आली. या वीजमीटरला येणाऱ्या केबलची तपासणी केली असताया मीटररूमच्यामागील खोलीत या इनकमिंग सर्विस केबलला अतिरिक्त केबल जोडल्याचे निदर्शनास आलेव या केबलद्वारे संपूर्ण राईस मीलचा वीजपुरवठा चालू असल्याचे निदर्शनास आले. याअतिरिक्त जोडलेल्या केबलवर देखिल सुरु असलेल्या वीज वापराप्रमाणे करंट दिसत होता.
शफिक रीर अंसारी याच्या विरोधात रामटेक पोलिस ठाण्यात विजचोरीचा गुन्हा दाखल
याप्रकरणी भारतीय बीज कायदा २००३ सुधारित २००७ कलम १३५ अन्वये ताज राईस मिलचे शफिक रीर अंसारी याच्या विरोधात रामटेक पोलिस ठाण्यात विजचोरीचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अपर्णा गिते (म.पो.से), नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, सुरक्षा व अंमजबावणी विभागाच्या नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुनील थापेकर यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्याऱ्यांनी केली.