परभणी (Parbhani) :- नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील अवैध दारु (Illegal liquor) व्यवसायीकांवर कारवाई करण्यासाठी आयोजीत मासरेडमध्ये ५८ कारवायांमध्ये १ लाख ८० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी केला आहे.
परभणी पोलीसांनी जिल्हाभरात शनिवार २१ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईमध्ये हातभट्टी दारु, दारुचे रसायन, देशी दारु, विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ अवैध दारु विक्रेत्यांवर ५८ दारु बंदी केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. यात हातभट्टी दारु २५९ लिटर, दारुचे रसायन १ हजार ३१० लिटर, देशी दारुच्या ९२३ बॉटल आणि विदेशी दारुच्या ३९ बॉटल जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख २६० रुपये असुन ही कारवाई जिल्हा पोलीस प्रशासनातील ५४ अधिकारी आणि १७९ अंमलदारांनी केली आहे. सदर कारवाई (action) जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधिक्षक, सर्व ठाण्यांचे पोलीस निरीक्षकांसह अधिकारी, अंमलदार यांनी केली आहे. तर अवैध व्यवसायांची पोलीसांना नागरीकांनी माहिती देण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.