परभणी(Parbhani) :- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात जिल्ह्यात सरासरीच्या १०३९.६ टक्के पावसाची (rain)नोंद झाली आहे. जी सरासरीच्या १० पट अधिक आहे. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने(Heavy Rain) जिल्ह्यातील मोठया प्रमाणात जनजिवन विस्कळीत झाले होते. तर सर्व महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करत मदत मिळणे अपेक्षीत आहे.
सरासरीपेक्षा १० पट अधिक पाऊस
१ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात १७५.७ मि.मी. पावसाची झालेली नोंद ही सरासरीच्या १०३९.६ टक्के आहे. यामध्ये तालुकानिहाय पाऊस ज्यात परभणी – १४५ मि.मी. (८४०.६ टक्के), गंगाखेड – १४६.८ मि.मी. (७६८.२ टक्के) , पाथरी -२५३.५ मि.मी. (१४०८.२ टक्के), जिंतूर – २०० मि.मी. (१२९२.८ टक्के), पूर्णा – १२६ मि.मी. (६०४.९ टक्के), पालम – १४५.७ मि.मी.(७८७.१ टक्के), सेलू – २०३.५ मि.मी. (१३४५ टक्के), सोनपेठ -१६७.१ मि.मी. (९९८.८ टक्के) आणि मानवत तालुक्यात – २२१.६ मि.मी. (१५३३.६ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. मागील २ दिवसात जिल्हाभरात मोठया प्रमाणात पावसामुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसाने हाहाकार केल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे, तलाव, लघु सिंचन प्रकल्पांसह मोठया जलाशयात पाण्याची आवक झाली.
नदीकाठच्या गावांचा संपर्कसुध्दा तुटला
त्यामुळे काही नदीकाठच्या गावांचा संपर्कसुध्दा तुटला होता. जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामूळे तुडूंब भरून वाहत आहे. या दोन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यातील आगामी काळातील पाणी प्रश्न जरी मिटणार असेल तरी झालेले नुकसान व हानी खूप मोठया प्रमाणात आहे. या नुकसानीमुळे शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. शासकीय स्तरावरून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, नागरीक आणि शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. नऊ तालुक्यांपैकी चार तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात १ हजार टक्के पेक्षा जास्त; मानवत तालुक्यात सर्वाधिक १५३३ तर पूर्णा तालुक्यात ६०४.९ टक्के सरासरी पाऊस