सरकारकडून कुटुंबाला दहा लाखांची मदत
परभणी(Parbhani) :- येथील संविधान विटंबना प्रकरणानंतर सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi)मृत्यू झालेल्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी विधानभवनात आपले मत व्यक्त केले. सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंबांना दहा लाख रुपयांची मदत व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घोषणेनंतर आंबेडकरी चळवळीत याचे काय पडसाद उमटतात याकडे बघावे लागणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानभवनात घोषणा
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) पुतळा परिसरातील संविधान विटंबना प्रकरणानंतर शहरात दगडफेक व इतर घटना घडल्या. त्यानंतर दुसर्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू (Death)झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले. राज्याचे राजकारण परभणीच्या घडामोडीमुळे चांगले तापले आहे. परभणीत देखील आंबेडकरी चळवळीच्या वतीने सोमनाथ व कालवश विजय वाकोडे यांना न्याय देण्याची मागणी घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे. या सर्व घडामोडीवर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले विटंबनेच्या घटनेनंतर जी दगडफेक झाली त्यामध्ये जवळपास व्यापार्यांचे एक कोटीच्यावर नुकसान झाले आहे. विटंबना करणारा आरोपी हा हिंदू मोर्चात सहभागी नसून तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केला असला तरी महिलांवर कुठलीही कारवाई केली नाही.
कुटुंबाला दहा लाखाची सरकारकडून मदत जाहीर
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला याविषयी अजूनही स्पष्टता नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. तोपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित केल्याची घोषणा केली. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाखाची सरकारकडून मदत जाहीर केली आहे. तसेच वत्सलाबाई मानवते यांनी महिला पोलीस कर्मचार्यास मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून गाडीत टाकले असे सांगून या प्रकरणात त्यांनी पोलिसांची बाजू घेतली. मुख्यमंत्र्यांनी असे बोलून परभणीच्या झालेल्या सर्व घडामोडीवर आपले मत व्यक्त केले आहे. न्यायालयीन चौकशी होणार असल्याने चौकशीत काय पुढे येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.