वाशीम (10th Exam Result) : मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (वर्ग १० वी) बोर्ड चा निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. या परीक्षेत भारत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेने आपल्या उज्ज्वल व दैदीप्यमान यशाची परंपरा यावर्षीही कायम ठेवलेली आहे. या (10th Exam Result) परीक्षेला शाळेतून एकूण ४६५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते व शाळेचा निकाल ९९.३५% एवढा लागलेला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेतील एकूण ९२ विद्यार्थ्यांनी ९०% च्या वर गुण प्राप्त केलेले आहे.तसेच १०२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९०% दरम्यान गुण प्राप्त केलेले आहेत. (10th Exam Result) तसेच ३४० विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये तर उर्वरित २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.
शाळेतील एकूण तीन विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात पैकीच्या पैकी १०० गुण घेतले आहेत तर एका विद्यार्थ्याने गणित या (10th Exam Result) विषयात पूर्ण १०० गुण घेतलेले आहेत. शाळेतून प्रथम येण्याचा मान कु.स्नेहल अरुण मुकाडे (९७.००%) हीने पटकाविला तर द्वितीय क्रमांक – श्रीजीत लक्ष्मण मेहेत्रे(९६.८०) व तृतीय क्रमांक – प्रथमेश नारायण मुंजे(९६.६०) या विद्यार्थ्यांनी पटकाविला.
विशेष म्हणजे शासनाने यावर्षी कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करून ही शाळेच्या दैदीप्यमान यशात कोणताही फरक पडला नाही. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य संजय भांडेकर, उपप्रचार्य संजय शर्मा, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर थोरात तसेच या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे त्यांचे वर्गशिक्षक व विशेष शिक्षक या सर्वांना दिलेले आहे.
शाळेच्या (10th Exam Result) स्पृहणीय व उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार आदरणीय अनंतरावजी देशमुख, उपाध्यक्षा सन्माननीय जयश्रीताई देशमुख तसेच संस्थेचे सचिव ॲड. नकुलदादा देशमुख यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व भरभरून अभिनंदन केलेले आहे. शाळेच्या यशाची पताका अशीच फडकत राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




