परभणी(Parbhani) :- घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटीचे देयक थकले आहे. त्यामुळे घंटागाड्यांवरील चालक, मजुरांचे वेतनही थकीत आहे. या वेतनासाठी कर्मचारी कामावर येत नाहीत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून शहरातील घंटागाड्या बंद आहेत. परिणामी शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिग दिसत आहेत.
मनपाकडे कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटी रुपये थकले
कचर्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्या (Health problems)देखील उद्भवत आहेत. शहरातील कचरा घरोघरी जावून संकलीत करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. महापालिकेकडून सदर एजन्सीला रक्कम दिली जाते. मात्र सप्टेंबर २०२३ पासून देयक देण्यात आलेले नाही. मनपाकडे कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटी रुपये थकले आहेत.
कंत्राटदाराने घंटागाडीवरील कर्मचारी, कामगारांचे वेतन (Salary) नियमित केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे(Financial difficulties) मागील तीन महिन्यापासून त्यांचे देखील वेतन थकले आहे. वेतनाची मागणी करत सोमवार ८ जुलै पासून वाहनचालक, मजुरांनी कामबंद केले आहे.
नागरीक आपल्या घरातील कचरा उघड्यार टाकत
त्यामुळे घंटागाड्या बंद आहेत. सोळा प्रभागात प्रत्येक प्रभागाला एक मोठे आणि चार लहान वाहन देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ८० घंटागाड्या, ८ ट्रॅक्टर, ३ कॉम्पॅक्टर, २ हायवा ही वाहने बंद आहेत. जवळपास तिनशे कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. या कर्मचार्यांनी वेतनाची मागणी करत कामबंद ठेवले आहे. परिणामी शहरातील घनकचरा संकलन पूर्णपणे ठप्प आहे. ठिकठिकाणी कचर्याचे ढिग जमा झाले आहेत. नागरीक आपल्या घरातील कचरा उघड्यार टाकत आहेत. आधीच पावसाळा त्यात कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उभ्या टाकल्या आहेत. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाल्यावर कंत्राटदाराचे देयक देण्यात येईल. सध्या मनपा निधीतून वेळोवेळी रक्कम अदा करण्यात येत आहे.