परभणी (Parbhani):- शनिवार ७ सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरूवात झाली. शहरी आणि ग्रामीण भागात मिळून १ हजार ८९७ ठिकाणी श्री ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती गणपतीच्या संख्येचा समावेश नाही. जिल्ह्यात ११५ ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे.
परभणीत गणेश उत्सवाला सुरूवात
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे मोठया हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. दरवर्षी विविध ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळाच्या वतीने श्रींची स्थापना केली जाते. यासाठी पोलीस प्रशासनाकडून रितसर परवानगी (allowed) घ्यावी लागते. परभणी जिल्ह्यात असलेल्या १९ पोलीस ठाणेंतर्गत शहरी आणि ग्रामीण अशा दोन वर्गवारीत परवानग्या दिल्या जातात. यावर्षी ७ सप्टेंबर पर्यंत शहरी भागात ४८७ गणपती मंडळानी स्थापना केली आहे. त्यामध्ये २१५ जणांनी परवानगी काढल्यानंतर २७२ मंडळे विना परवाना आहेत. ग्रामीण भागात ६२५ मंडळांनी परवानगी घेतली आहे. तर ७८५ मंडळे विना परवाना आहेत. याच बरोबर परभणी ग्रामीण, दैठणा, ताडकळस, पूर्णा, पालम, सेलू, मानवत, बोरी, गंगाखेड आणि सोनपेठ पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये ११५ ठिकाणी एक गाव एक गणपती बसवण्यात आला आहे.
गणेश उत्सव २०२४ मध्ये शहरी आणि ग्रामीण भागात मिळून १ हजार ८९७ ठिकाणी श्री ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ८४० गणेश मंडळांनी परवाना काढला आहे तर १ हजार ५७ गणेश मंडळाने विना परवानगी श्री ची स्थापना केली आहे.