एकूण १४२१६ पैकी १३५९४ विद्यार्थी उपस्थित; ६२२ विद्यार्थी गैरहजर
हिंगोली (12th Exam) : हिंगोली जिल्हयातील १२ वी च्या ४० परीक्षा केंद्रावर ११ फेब्रुवारी रोजी सकाळ सत्रात इंग्रजी या (12th Exam) विषयाचा पेपर पार पडला. इंग्रजी विषयाच्या परीक्षेला १४२१६ विद्यार्थ्यापैकी १३५९४ विद्यार्थी उपस्थित होते. तर ६२२ विद्यार्थी गैरहजर राहीले उपस्थितीचे प्रमाण ९५.६२टक्के राहीले.
विभागीय मंडळाने नेमलेल्या ४ भरारी पथकाने आज हिंगोली जिल्ह्यातील परीक्षा केंद्राना भेटी दिल्या. हया व्यतिरिक्त मुख्य विषयांना २४ संवेदनशील परीक्षा केंद्रावर श्रेणीवर्ग-१ चे भरारी पथक स्थापन केलेले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त असुन (12th Exam) परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने आण करणा-या सहाय्यक परिरक्षका सोबत पोलिस कर्मचारी देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला. या परीक्षेत एक विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करीत असताना पथकाच्या निदर्शनास आल्याने त्याच्यावर (12th Exam) कॉपी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.