यवतमाळ (12th Exam Result) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजाता जाहीर करण्यात आला आहे. यात जिल्ह्याचा निकाल ९०.६३ टक्के लागला असून सालाबाद प्रमाणे यंदाही मुलींच निकालाच्या टक्केवारी प्रथम आहे. यात तब्बल ९४.५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.तर मुलांची टक्केवारी ८७.६० आहे. महागाव आणि उमरखेड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
१२ वर्गाच्या निकलाच्या टक्केवारीत अमरावती विभागातून यवतमाळ जिल्ह्याचा ४ क्रमांक लागला असून मागील वर्षी सुध्दा यवतमाळ जिल्ह्याचा ४ था क्रमांक होता. जिल्ह्यात ३२ हजार २७० विद्यार्थी 12th Exam Result) बारावीच्या परीक्षेला बसले होते. यामध्ये १७ हजार १०८ मुले तर १५ हजार १६२ मुलींचा समावेश होता. मात्र प्रत्यक्ष ३२ हजार ५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २१५ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.
विशेष म्हणजे नियमितपणे अभ्यास करणाड्ढया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी माध्यमिक व (12th Exam Result) उच्च शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविले होते. मात्र यंदाही कॉपीमुक्त अभियानाला जिल्हात हरताळ फासला गेला. अशा स्थितीत सोमवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये (12th Exam Result) बारावीची प्रत्यक्ष परीक्षा देणार्या ३२ हजार ५५ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात १४ हजार ८८६ मुले तर १४ हजार १६६ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.६३ टक्के लागला असून मुलींची टक्केवारी ९४.५ आहे. तर मुलांची ८७.६० आहे.
जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये महागाव आणि उमरखेड तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे. यात महागाव तालुक्याचा ९७.५२ तर उमरखेड चा ९७.३१ टक्के निकाल लागला आहे. तर मारेगाव तालुक्याचा सर्वात कमी ७६.९१ टक्के निकाल आला आहे.




