नागपूर (Nagpur 12th Result ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board) जाहीर करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रामणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षेत मुलींनीच पुन्हा या नागपूर विभागात वर्षी बाजी मारली आहे. नागपूर विभागात एकून १५६३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. (12th Result) त्यापैकी१५५३७४ मुले-मुलींनी परीक्षेत बसले होते. यातून १४३१३१ विद्यार्थी मुले-मुली उत्तीर्ण झाले. यात ७१०४६ मुले तर ७२०८५ मुली उत्तीर्ण झालेत. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ही ८९.८५ टक्के तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.४६ टक्के आहे. यावरुन मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे निकालावरुन दिसून येते.
मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१२
नागपूर जिल्ह्याचा विचार केला असता, ६३६४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ३२३२० मुलांचा तर ३१३२४ मुलींचा समावेश होता. यामध्ये एकून ६३२६५ मुला-मुलींनी परीक्षा दिली. यामध्ये ३२०८४ मुले तर ३११८१ मुलींचा समावेश आहे. यापैकी ५६८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २८०२६ मुले तर २८८७२ मुलींचा समवेश आहे. (12th Result) यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ही ८७.३५ टक्के तर मुलींची उर्त्तीण टक्केवारी ९२.५९ टक्के आहे. एकून जिल्ह्याचा निकाल हा ८९.९३ टक्के लागला. यंदाही नेहमीप्रमाण बारावीच्या निकालात नागपूर विभागासह नागपूर जिल्ह्यात मुलींचा डंका वाजला आहे.
नागपूर शहरातही मुलीच हुशार
नागपूर शहरातूनून ३५५७२ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापेकी ३५३७३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. (12th Result) यापैकी ३०९२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १४६१९ मुले तर १६३०२ मुलींचा समावेश आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९०.७१ टक्के तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८४.०० टक्के आहे. एकून नागपूर शहराचा निकाल हा ८७.४१ टक्के लागला.
बारावीच्या निकालात नागपूर विभाग आठव्या स्थानी
बारावीव्या परीक्षेत नागपूर विभागात एकून १५५३७४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यापैकी १४३१३१ विद्यार्थी उर्तीण झाले. (12th Result) यामध्ये ७१०४६ मुले तर ७२०८५ मुली उत्तीर्ण झाले असून त्यांची एकून टक्केवारी ही ९२.१२ टक्के आहे. अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या ही १२,२४३ आहे.