लातूर (National Lok Adalat) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वाद पूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीत १४११ दावे निकाली काढण्यात यश आले. या (National Lok Adalat) लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. व्ही.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२८) करण्यात आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भू-संपादन, १३८ एन. आय. अॅक्ट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व बँकांची वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमण ध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड व लातूर महानगरपालिका यांची रक्कम वसुली बाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी एकूण १४११ प्रकरणे निकाली लागले असून व रक्क्म रुपये ९ कोटी ६९ लाख १० हजार ३०९ रुपये तडजोडीने मिळाले आहेत.
या लोकन्यायालयामध्ये जिल्हयातील एकूण ३१ पॅनेलवर न्यायाधीश व विधिज्ञांनी काम केले. (National Lok Adalat) लोकन्यायालयासाठी आर. बी. रोटे जिल्हा न्यायाधीश १, जे. सी. ढेंगळे, श्रीमती. एम. एन. चव्हाण, लातूर तसेच लातूर मुख्यालयातील सर्व न्यायाधीशाचे व लातूर वकील मंडळाचे अध्यक्ष शरद इंगळे व पदाधिकारी, महाराष्ट्र बार कॉन्सीलचे सदस्य श्री. आण्णाराव पाटील यांचे सहकार्य लाभले.
तसेच या लोकअदालतीमध्ये पॅनलवर न्यायाधीश डी. बी. माने,आर.एम. कदम जी. सी. बेंगळे, एम. एन. चव्हाण, एस. पी. केस्तीकर नलगे, जे. जे. माने, . एम. एस. निकम, श्रीमती. ऐ. ऐ. पिरजादे-पाटील, पी. एफ. शिंदे व अॅड. फड शिवाजी पाराजी, अॅड तांबोळी रिहाना, के, अॅड राजमल्ले बालाजी पुंडलिकराव, अॅड. ढगे नेहा. आय, अॅड. केंद्रे स्वाती रमाकांत, अॅड. रणदिवे श्रीकृष्णा प्रभाकर, . अॅड कोंडमगिरे मिरा. एन, अॅड. शेख आयशा के, एन. पी. गायकवाड यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.
लोकन्यायालय (National Lok Adalat) यशस्वी करण्यासाठी पी. पी. केस्तीकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक बी. के. राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अधिक्षक एन. डी. दोरवे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे, न्यायालयाचे सर्व कर्मचारी यांचे योगदान लाभले.