लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय, पक्षकारास केला 44 लाखाचा धनादेश सुपूर्द
हिंगोली (Court Cases) : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दि.22 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे (Court Cases) आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 429 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका यांची वाद दाखलपूर्व 3 हजार 330 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 144 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 4 कोटी 37 लाख 92 हजार 708 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
न्यायालय परिसरातील वृक्षांना पाणी देऊन जागतिक जल दिन साजरा
या (Court Cases) लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेले पाच पॅनल तयार करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 पी. जी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यु. राजपूत, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले.
ही लोकअदालत (Court Cases) यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.ए.माने-गाडेकर, मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती ए. बी. कुरणे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी. के. नंदनवार, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी यांनी प्रयत्न केले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. भुक्तर, उपाध्यक्ष ॲड. ए. पी. बांगर, सचिव ॲड. अखील अहेमद, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय
पक्षकारास केला 44 लाखाचा धनादेश सुपूर्द
या लोकअदालतीमध्ये (Court Cases) ज्याेती शिवाजी भालेराव (41 वर्षे) हिचे पती शिवाजी भालेराव हे अपघातामध्ये दि. 3 एप्रिल, 2024 रोजी मयत झाल्याने विद्यमान न्यायालय, हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दि. 8 मे, 2024 रोजी दावा दाखल केला होता. हे प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड होऊन तडजोडी अंती 44 लाख रुपये रक्कम ठरविण्यात आली. या प्रकरणामध्ये लोकअदालतीच्या दिवशीच तात्काळ रॉयल सुंदरम इंशुरन्स कंपनीतर्फे पक्षकारांना सदरील रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
लोकअदालतीचे (Court Cases) कामकाज सुरु होण्यापूर्वी न्यायालयीन परिसरातील वृक्षांना मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन (World Water Day) जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. पुढील लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी आपली प्रकरणे ठेवून जलद न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे.