Maharashtra:- महाराष्ट्रातील लातूरमध्ये बेकायदेशीर होर्डिंगशी (Hoarding) संबंधित किमान 15 प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यात एकाच दिवसात 11 प्रकरणांचा समावेश आहे. सोमवारी लातूर महापालिकेच्या (Latur Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी शहरातून दोन होर्डिंग आणि १५ बॅनर (banner) हटवले.
13 मे रोजी मुंबईत बेकायदेशीर होर्डिंग पडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये 16 जणांचा मृत्यू (death) झाला होता. शहरातील सर्व होर्डिंग्ज काढण्यासाठी लातूर महापालिकेने रविवारपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर सोमवारी बेकायदा होर्डिंगशी संबंधित अकरा गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्यात 15 प्रकरणे नोंदवली गेली.