मानोरा(Washim):- तालुक्यात ऑगस्ट २०२४ मध्ये मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) ते ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले यामध्ये १५,७४९ शेतकऱ्यांचा समावेश असून तब्बल १०८९२ हेक्टर क्षेत्रफळात जमिनीवरील पिके खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा अहवाल हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले असताना १४ कोटी ८१ लाख ३४१९२ रुपये नुकसान भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांना केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे.
१४ कोटी ८१ लाख ३४१९२ रुपये नुकसान भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांना केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर…
सन २०२४ च्या अतिवृष्टी पाठोपाठ दि २ नोव्हेंबर मध्ये ही अतिवृष्टीने मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यात ३१ ऑक्टोबर २ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे मानोरा मंडळातील ५ गावे तर गिरोली, इझोरी, उमरी (बु ) या मंडळातील फळबाग , भाजीपाला सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे नुकसान झाले होते. १०, ८९२ बाधित शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळ जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले तर मानोरा, गिरोली, उमरी( बु), इझोरी या मंडळातील शेतकऱ्यांच्या १०८९२ हेक्टर क्षेत्रफळ जमिनीवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अशाप्रकारे सर्व मंडळातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येऊन तलाठी, कृषी सहायक(agricultural assistant), ग्रामसेवक या त्रिस्तरीय पथकाने पंचनामे केले व केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण १५७४९ बाधित शेतकऱ्यांच्या १०८९२ क्षेत्रफळातील जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून याबाबत तब्बल १४ कोटी ८१ लाख ३४ हजार १९२ रुपये नुकसान भरपाईच्या निधीची अपेक्षित म्हणून अहवाल हा तहसील कार्यालयाकडून मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, अशाप्रकारे सर्व मंडळातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येऊन तलाठी, कृषी सहायक , ग्रामसेवक या त्रिस्तरीय पथकाने पंचनामे केले व केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण १५७४९ बाधित शेतकऱ्यांच्या १०८९२ क्षेत्रफळातील जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे.




