हिंगोली(Hingoli):- शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्या वाहन चालकाविरूद्ध प्रभावीपणे कारवाई (action)केली जात आहे. मागील आठवड्यात शहर वाहतूक शाखेतर्फे १४६८ वाहन चालकांवर १६ लाख ४ हजार ७५० रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहन चालकांना शिस्त लावण्याचा पोलीसांचा प्रयत्न
हिंगोली शहरामध्ये वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहर वाहतूक शाखे तर्फे प्रयत्न केले जात असून या संदर्भात अनेक वेळा वाहन चालकात जनजागृतीही (public awareness) केली जाते. हिंगोली शहरात २२ ते २८ जुलै या दरम्यानच्या कालावधीत शहर वाहतूक शाखे तर्फे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा (Penal action) बडगा उपसण्यात आला. त्यात भरधाव वेगातील वाहने चालविणार्या ३२७ वाहन चालकांवर ६ लाख ५२ हजाराचा दंड आकारण्यात आला. तसेच ट्रीपल सीट वाहन चालविणार्या वाहन चालकांवर २६५ केसेस करून २ लाख ६३ हजाराचा दंड आकारण्यात आला. वाहन चालविताना मोबाईलचा (Mobile) वापर करणार्या ४९ वाहन चालकांवर ७६ हजाराचा दंड व इतर विविध कलमान्वये ८२८ वाहन चालकांवर ६ लाख १३ हजार ७५० रूपयाचा दंड अशा एकूण १४६८ वाहन चालकांवर १६ लाख ४ हजार ७५० रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
प्रत्येक दिवशी कारवाईचे सत्र सुरूच
विशेष म्हणजे हिंगोली शहरातील वाहतुकीच्या रस्त्यावर हातगाडे, फेरीवाले यांनी गाडे उभे केल्यास तसेच तीन चाकी, चारचाकी व इतर वाहने रस्त्याच्या मधोमध उभे आढळुन आल्यास त्यांच्यावर कलम २८३ प्रमाणे कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी दिला आहे.
प्रत्येक दिवशी कारवाईचे सत्र सुरूच. ही कारवाई पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड, पोहेका गजानन राठोड, सुभाष घुगे, वसंत चव्हाण, शिवाजी पारसकर, पोलीस नाईक संभाजी मोरे, संजय चव्हाण, संतोष घुगे, राजकुमार सुर्वे, कपील जाधव, सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, विद्या भुजबळे यांनी कारवाई केली.