लातूर (Latur):- सामाजिक विशेषत: आरोग्य(Health) आणि शैक्षणिक (Educational) क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दिशा प्रतिष्ठानने १७ विद्यर्थांना २ लाख ३९ हजार ९०० रुपये शैक्षणिक फीससाठी सहकार्य केले़. या सहकार्यामुळे गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला़.
सहकार्यामुळे गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोठा आधार
दिशा प्रतिष्ठानने अविष्कार किरण मुळे १० हजार, आलिशा मुलानी १२ हजार, तेजस शंकर पांचाळ १५ हजार, प्रगती अरविंद काकडे १० हजार, तन्वी हंसराज सोळुंके १३ हजार, रोहन बिबीशन शिंदे १५ हजार, डोंबाळे ज्योती बबन २० हजार, मोरे अंकिता दिनकर १८ हजार, दायमा ओमप्रकाश अनिल १० हजार, आदर्श भाऊराव राठोड ७ हजार, प्रणव अनंतराव कांबळे २० हजार, महेक शेख २० हजार, पंकज रवीदास राममावत १५ हजार, वैभव भोपले १६ हजार, नम्रता मारुती भोसले १० हजार, परमेश्वर रामेश्वर भारती २० हजार, मुंगारे भूमिका ८ हजार ९०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले़. आर्थिक दृष्ट्या अडचणीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना दिशा प्रतिष्ठानकडून शैक्षणिक प्रवेश शुल्क करिता मदतीचा हात देण्यात आला. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या मूळ हेतूच्या सकारात्मक प्रयत्नामधून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी दिशा प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील आहे़.
विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी दिशा प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील
याप्रसंगी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, डॉ़. अशोक आरदवाड, हंसराज जाधव, छायाताई चिंदे, जगदीश कुलकर्णी, वेताळेश्वर बावगे, नितीन थिटे, संभाजी रेड्डी, दिशा प्रतिष्ठान सर्व संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी केले.
लातूर मल्टी स्टेट को-आॕपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाहिद शेख यांनी केले तर दिशा प्रतिष्ठानचे संचालक तथा फिरता दवाखानाचे प्रमुख इसरार सगरे यांनी आभार मानले़. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा प्रतिष्ठानच्या संचालिका वैशाली यादव यांनी प्रयत्न केले.