हिंगोली (hingoli):- सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथे महावितरणच्या लघुदाब विद्युत वाहिनीवर(electrical duct) आकडे टाकून वीज चोरी केल्याने १८ आकडे बहाद्दरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरजखेडा येथे महावितरणच्या लघुदाब विद्युत वाहिनीवर महावितरणची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आकडे टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी १४ जूनला गोरेगाव शाखा महावितरणचे सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांनी रितसर फिर्याद दिली. ज्यामध्ये रामदास चांगदेव मगर, संजय पुंजाजी मगर, अमोल धोंधाजी मगर, रूस्तूमराव उत्तमराव गवळी, पांडूरंग शंकर मगर, पंढरी जनार्धन मगर, विठ्ठल नारायण घनघाव, गजानन श्रीराम कावरखे, शामराव किशन मगर, संजय प्रल्हाद मगर, भगवान पांडूरंग मगर, प्रकाश मच्छिंद्रनाथ बवाने, विनायक किसन मगर, जगन तुकाराम मगर, सोपान जनार्धन मगर, रामदास राजाराम मोरे, सुरेश विश्वनाथ मगर, मदन तुकाराम जाधव सर्व रा.सुरजखेडा यांच्या विरूद्ध कलम १३५, वीज अनियमनांतर्गत गुन्हा दाखल (crime registered) करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.