पुणे(Pune):- महाराष्ट्रातील संभाजीनगर (Sambhajinagar)आणि पुणे महामार्गावर रात्री कंटेनर (container)आणि ट्रॅव्हलर बसमध्ये धडक झाली. संभाजीनगरच्या धोरेगावजवळ हा अपघात झाला असून यात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना उपचारासाठी(treatment) घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर आणि ट्रॅव्हलर(traveler)
बसमध्ये एवढा भीषण अपघात(A terrible accident) झाला की बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या पुण्यात पोर्शेने दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन तरुण ताशी 200 किमी वेगाने पोर्श चालवत होता आणि रात्री 2.30 च्या सुमारास त्याने दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना धडक(strike) दिली. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण आणि तरुणी दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली मात्र तो अल्पवयीन असल्याने न्यायालयाने अल्पवयीनाची सुटका केली. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून कारवाई करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे