हिंगोली (Surya Ghar Yojana) : घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेला (Surya Ghar Yojana) मराठवाडयात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडयातील आठ जिल्ह्यात ३१,१५३ सुर्यघर योजनेसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी ३१,१०२ अर्जांना मान्यता मिळाली आहे. तसेच छतावरील सुर्यघर योजनेचे संच बसविण्याचे काम प्रगतिपथावर असून ही घरे प्रकाशमान होणार आहेत. ज्यामध्ये हिंगोली मंडळात १९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही (Surya Ghar Yojana) योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसविणार्या २५,०८६ ग्राहकांना अनुदानाची रक्कम रुपये १६० कोटी थेट ग्राहकांना हस्तांतरीत करण्याचे काम सुरु आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३,५१,९४२ ग्राहकांची प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणी झालेली आहे. यापैकी योजनेत २,३३,४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी घरांना रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प रु.७५,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे. ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते. (Surya Ghar Yojana) शिल्लक वीज महावितरण विकत घेते.निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत मिळते. ३ किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. १८,००० अनुदान मिळते. ३ किलावेंट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. ७८,००० पर्यंत मर्यादित आहे.
मराठवाड्यात ३१,१५३ ग्राहकांनी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज केले. त्यापैकी ३१,१०२ ग्राहकांचे अर्ज मंजूर झाले असून यातून २०,७८१.४३ किलोवॅट उर्जा निर्मिती होणार आहे. व ५२२५ ग्राहकांच्या घराच्या छतांवर संच बसवून वीज निर्मिती सुरू झाली असल्याने यांना मोफत विजेचा लाभ मिळून शुन्य विजबिलाचे लाभार्थी झाले आहेत. या (Surya Ghar Yojana) योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.