Parbhani:- आ.डॉ.राहुल पाटील यांनी सदर प्रकरणात चौकशी करून आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी नगर विकास विभागाकडे केली आहे. एकीकडे शरह बकाल झाले असताना नवीन वाहन खरेदीवर २ कोटीचा चुराडा करण्यात आला आहे. याकडे आ.डॉ.पाटील यांनी लक्ष वेधत चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
आ. डॉ. राहुल पाटील यांनी केली चौकशीची मागणी
शहर महापालिकेने मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत मनमानी खर्च केला आहे. अग्निशमन दलाचे (fire brigade) नवे कार्यालय नसतानाही २ कोटी रुपयाच्या चार गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. सध्या ही वाहने धुळखात पडली आहेत. गरज नसतानाही वाहन खरेदीचा घाट अर्थपुर्ण उद्देशाने करण्यात आला आहे. याची एका स्वतंत्र समितीद्वारे चौकशी करून आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे.
शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. बकाल अवस्थेत असलेल्या शहराबाबत महापालिका आयुक्त शब्दही काढत नाही. मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी मनमानी पध्दतीने कारभार सुरू आहे. नागरीक, लोकप्रतिनिधींचे न ऐकता हुकूमशाही पध्दतीने काम केले जात आहे. आयुक्तांचे मत्रालयात लागेबांधे असल्याची चर्चा आहे. कोणतीही मुलभूत तयारी नसताना नवीन वाहने घेण्याचा घाट का घातला असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व काही संशयास्पद असून या बाबीची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई (action) करावी अशी मागणी आ.डॉ.पाटील यांनी केली आहे. नवीन घेतलेल्या वाहनांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा देखील नाही. सध्या ही वाहने कल्याण मंडपम् परिसरात उभी आहेत.