Umarkhed crime :- पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या अवैध धंदे कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात ९ जुलै रोजी पोउपनि योगेश जाधव यांना मिळालेल्या माहीतीवरून त्यांनी उमरखेड महागाव महामार्ग रोडवर असलेल्या राजस्थान धाब्याजवळ एक व्यक्ती ज्याने अंगात काळया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केलेला होता असा व्यक्ती गांज्याची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या गांजा, अंमलीपदार्थ (Narcotics) घेउन रस्त्याने येत होता.
एकुण ४६ हजार रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ माल जप्त
ही गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ उमरखेड, पोउपनि योगेश जाधव, पोउपनि सागर इंगळे, नोळे ,महाळनर, दरबस्तेवार, चालक रुद्र तसेच वजनकाटेवाले,फोटोग्राफर, दोन सरकारी पंच असे रवाना होवुन सदर ठिकाणी जावुन आरोपी गजानन अशोक डहाळे (२५), रा. गोचरस्वामी वार्ड, सोनार लाईन, उमरखेड यांचे ताब्यातील एक पांढर्या रंगाची नायलॉनची पोतडी ज्याच्यावर राष्ट्रीय उत्पादक्ता पुरस्कार विभुषीत असे लाल अक्षरात लिहलेले ज्यामध्ये हिरवट काळपट गांजा (Marijuana) अंमली पदार्थ ज्याचे वजन २३१३ ग्रॅम किमंत अं २० हजार रुपये प्रति किलो प्रमाणे असा एकुण ४६ हजार रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ माल मिळुन आला. एक पांढर्या रंगाची नायलॉनची पोतडी ज्याच्यावर राष्ट्रीय उत्पादक्ता पुरस्कार विभुषीत असे लाल अक्षरात लिहलेले पोतडीचे खाली वजन ११५ ग्रॅम, एकुन वजन २४२८ ग्रॅम असा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पो.स्टे उमरखेड येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
