परभणी (Parbhani):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत अंत्योदय योजना, प्राध्यान्य कुटूंब, एपीएल शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त जिल्हाभरातील २ लाख ८३ हजार ५३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत देण्यात येत आहे.
आनंदाचा शिधा सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत देण्यात येत आहे
परभणी जिल्ह्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गौरी-गणपती सणानिमित्त चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेल्या संचाचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये १ किलो प्रमाणात साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो रवा व एक लिटर सोयाबीन तेल (soybean oil) असलेला संच लाभार्थ्यांना शासनाने मंजुर केला आहे. जिल्ह्यातील तीन योजनेंतर्गत ज्यामध्ये अंत्योदय योजनेच्या ३८ हजार २६६, प्राधान्य कुटूंब योजनेच्या २ लाख ७ हजार ७०७ शिधापत्रिकाधारक, आत्महत्याग्रस्त एपीएल केसरी शेतकरी (Farmer)शिधा योजनेच्या ४० हजार ८१ शिधापत्रिकाधारक असे एकूण २ लाख ८३ हजार ५४ लाभार्थ्यांना या संचाचे वितरण करण्यात येत आहे. वरील सर्व शिधा जिन्नस संच गोदामापर्यंत पोहोचविण्याची जवाबदारी कंत्राटदारांकडे देण्यात आली असून तहसलिदारांनी स्व:त तालुका गोदामात आनंदाचा शिधासंच प्राप्त झाल्यास याद्दच्छिकपणे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्यात यावी, व त्यानंतरच लाभार्थ्यांकडे वर्ग करावेत.
लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून संच मिळणार
जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी-गणपती सणानिमित्त नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेल्या आनंदाचा शिधा संच लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे शासन नियमानूसार देय असलेले शंभर रूपये भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना गौरी-गणपती उत्सवाचा सण आनंदात साजरा करण्यात यावा, यासाठी राज्या शासनाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात शासन निर्णयाद्वारे आनंदाचा शिधा देण्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यानूसार जिल्हा प्रशासनास २ लाख ८३ हजार ५४ संच उपलब्ध झाले आहेत. त्याचे वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा गौरी गणपतीचा सण सर्व सामान्य नागरीकांच्या घरी उत्साहात साजरा व्हावा, यासाठी शासनाकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील अंत्योदय योजना, प्राधान्य कुटूंब, एपीएल शेतकरी कुटूंब शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणार आहे.