सिंदे(Chandrapur) :- वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र डोंगरगाव (सा.) येथे जंगली डुक्कराच्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.
गावात घूसून भांडी धुणार्या महिलांवर हल्ला
प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (सा.) येथील सरस्वता गणपत मानकर (७३) व विशाखा पुरुषोत्तम मेश्राम (४३) या सकाळी साडेसात वाजता या गावात घराजवळ भांडी धुत असताना एका पाठोपाठ दुसरीवरही अचानक रानटी डुकराने हल्ला (attack) करून जखमी केले. दोन्ही जखमी महिलांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालय(hospital) सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. वन्यप्राणी गावात घूसून मानवावर हल्ले करण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या असून या घटनेवर आळा बसने गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करावी. अशीच घटना सिन्देवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव सालोटकर ह्या गावात घडल्याने दहशत पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उपवनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले व वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून जखमींचा पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत. जखमीनां तात्काळ मदत देऊन गावात शिरकाव करून मानवावर हल्ला करणार्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.