मानोरा (Washim):- बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथील तिर्थक्षेत्र विकास कामासाठी शासनाने(ruling) ११ जून रोजी २० कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे रखडलेल्या विकास कामांना गती मिळणार आहे.
रखडलेल्या कामांना गती येणार
उमरीगड व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शासनाने जानेवारी २०२३ मध्ये ३२६. २४ कोटी रुपयांची मान्यता दिली होती. त्यानंतर मार्च २०२३, जानेवारी, फेब्रुवारी २०२४ मध्ये १४३. ९१ इतका निधी शासनाने जिल्हाधिकारी यांना वितरित केला आहे. पुढील निधीची मागणीनुसार श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी येथे २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी ३० कोटी निधी अर्थसंकल्पीत(budgeted) करण्यात आला आहे. यापैकी उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र आराखड्यासाठी १० कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.
संत सेवालाल महाराज पोहरादेवी येथील विकासकामांसाठी २०१७ ते २०२४ पर्यंत ३७९. ७४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. यापैकी १६७. ०९ कोटी रुपये निधी जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे. पोहरादेवी येथे अधिक निधी उपलब्ध करण्याच्या प्रस्तावावरून २०२४ – २५ या आर्थिक वर्षासाठी ३० कोटी रुपये निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. त्यापैकी १० कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. तिर्थक्षेत्र उमरी व पोहरादेवी तिर्थविकास कामासाठी शासनाने २० कोटी रूपये निधी वितरित केल्याने तिर्थक्षेत्र (Pilgrimage area) विकास कामाला गती मिळणार आहे.
पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी येथील तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामासाठी शासनाकडून ७. २५ कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. वाढीव निधीसाठी सुध्दा प्रयत्न करून दोन्ही तिर्थक्षेत्र विकास कामासाठी २० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने विकास कामाला गती मिळणार आहे.