परभणी(Parbhani):- स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवार २१ ऑक्टोबर रोजी रात्री दर्गा रोडवरील टिचर कॉलनी भागात कारवाई करत काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदुळ जप्त केला. या कारवाई मध्ये २० क्विंटल तांदुळ पकडण्यात आला. पोलिसांनी एका वाहनासह ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
स्थागुशाचे पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलिस अंमलदार शेख रफिक, निलेश परसोडे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत असताना या पथकाला दर्गा रोडवरील शिक्षक कॉलनी भागात रेशनचा तांदुळ (Ration rice) साठवुन ठेवला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना एका वाहनात तांदुळ भरताना काहीजण मिळून आले. सदर धान्या विषयी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी शेख अरबाज, शेख मुश्ताक यांना ताब्यात घेतले. तर उध्दव बोचरे हा सदर ठिकाणावरुन निघुन गेला. पोलिसांनी मुद्देमालासह संशयीतांना कोतवाली पोलिस ठाण्यात हजर केले.