ब्राम्हणवाडा (Maha Arogya camp) : सेनगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणीद्वारा आयोजित नाकाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल हिंगोली व ग्रामपंचायत कार्यालय ब्राम्हणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जानेवारी मंगळवार रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात २०० रुग्णांची मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरा मार्फत करण्यात आली.
ब्राम्हणवाडा येथे मोफत आरोग्य महाशिबीराचे (Maha Arogya camp) आयोजन २१ जानेवारी मंगळवार रोजी करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सरपंच सौ. सुमन निळकंठराव मेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ब्राम्हणवाडा ग्रामपंचायत व नाकाडे हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी २१ जानेवारी रोजी विविध रुग्णासाठी मोफत शिबीर घेण्यात आले. या शिबीरात डॉ. संजय नाकाडे (फिजीशियन), डॉ. लोकेश गौंड (अस्थीरोग तज्ञ), शैलेश राजपुत, रामप्रसाद लोंढे, माधव मेटकर, नागेश नरवाडे, संदि पाखरे, सुशांत सुर्यवंशी, चंदा कुरील, यांच्यासह अनेक तज्ञ डॉक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या (Maha Arogya camp) आरोग्य शिबीरात महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत अल्प उत्पन्न असलेल्या कुटूंबासाठी नि:शुल्क व गुणवत्तापुर्व आरोग्य उपचार करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्न योजना, अन्नपुर्णा योजना, शिधापत्रिका धारक कुटूंबे, अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका व सातबारा उतारा धारक शेतकरी कुटूंबे, शासकीय अनाथ श्रमातील मुले, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला, आश्रमातील महिला, शासकीय वर्धश्रामातील जेष्ठ नागरीक, माहिती व जनसंपर्क कार्यालयातील निकषानुसार, पत्रकार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत, जिवीत बांधकाम कामगार व त्यांचे कुंटूबिय व संबधित संस्था प्राधिकरण यांच्याकडील ओळखपत्रानुसार पात्र वैद्य शिधा पत्रिका फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड यासह कॅन्सर, ह्दयरोग शस्त्रक्रिया, मुत्रपिंढ व मुत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जा संस्था विकार, अस्थव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टीक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग आदी रुग्णाची तपासणी डॉ. संजय नाकाडे,डॉ. लोकेश गौंड आदी तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषद गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या महाआरोग्य शिबीरात २०० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी ब्राम्हणवाडा सरपंच सुमन निळकंठराव मेटकर,ग्रामपंचायत अधिकारी मारोतराव कावरखे यांच्यासह दिलीप वायचाळ, प्रथमेश मेटकर, शिवाजी कोंगे, जगन वायचाळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवराव वायचाळ यांनी तर आभार पत्रकार शिवाजी मेटकर यांनी मानले.तर अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या (Maha Arogya camp) महाआरोग्य शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला.