पोलिसांचा सर्वत्र चोख; बंदोबस्त अफवा पसरविणाऱ्यावर कारवाईचा इशारा
हिंगोली (Akhara Balapur Crime) : कळमनुरी तालुक्यातील कुपटी येथे झालेल्या भांडणाच्या कारणातून आखाडा बाळापूरात बुधवार रोजी रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाणीत काहीजण जखमी झाले असून पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या (Akhara Balapur Crime) प्रकरणात दोन्ही गटातर्फे १३ मार्चला परस्पराविरुध्द दिलेल्या फिर्यादीवरून २०७ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.
आखाडा बाळापूर येथे १२ मार्च बुधवार रोजी रात्री दोन गटात सुरू झालेल्या वादाने रात्री उशिरापर्यंत मोठे स्वरूप धारण करत दगडफेक करण्यात आली. दगडफेक मध्ये चार पाच वाहनांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर प्रकार कळताच जादा (Akhara Balapur Crime) पोलीस बंदोबस्त तैनात करून स्वतः पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, सह स्थानिक अधिकारी, एलसीबी अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन परीस्थिती नियंत्रणात आणली.
रात्री व गुरुवारी सकाळपासुन गावात प्रमुख ठिकाणी फिक्स पांईट नेमुन (Akhara Balapur Crime) पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कळमनुरी, कुरूंदा, बासंबा, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्थानकातील पाच-पाच कर्मचारी व एक अधिकारी तसेच स्थानिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्त फिक्स पांईट जागी व वाहनाद्वारे गस्त गावात सगळ्या भागात सुरू आहे.
बुधवार रोजी सायंकाळी कुपटी येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात वादविवाद, शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर प्रकरण शांत झाले असता रात्री पुन्हा दोन्ही गटात वाद होउन दगडफेक झाली. नंतर मोठा जमाव रस्त्यावर व पोलीस स्थानकात जमा झाला होता. (Akhara Balapur Crime) गावातील प्रतिष्ठीत मंडळीनी वाद मिटावा म्हणून आटोकाट प्रयत्न केले. परंतु वाद शमला नाही, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी जादा पोलीस बंदोबस्त पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली पहाटे दोन्ही बाजुच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.
ज्यामध्ये रोहीत विनायक पडघणे यांनी दिलेल्या फिर्यादीत आझरू शेख, सय्यद मतीन, मोहसीन कादरी, आसलम शेख, सोनू शेख, सद्दाम शेख, अनिस सौदागर, असलम वेल्डींगवाला, मुज्जू शेख, सोहेब शेख, खालेद पटेल, जहीर फिल्टर, आमीन कादरी, तोहसीफ शेख, इंजिनियर कादरी, हांटर सर्व रा. आखाडा बाळापूर व इतर १०० ते १५० आरोपी तर शेख गुलाम मुस्तकिन गुलाम मुस्तफा यांनी दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत राहूल पातोडे, जोतीपाल पंडीत, धारबा पंडीत, विकास भारत पंडीत, अभिजीत बाळू नरवाडे, कपील पंडीत, गोलू बाळूक पाईकराव, विजय सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी, अनिल काशिदे, धारुकुमार काशिदे, राजकुमार सुर्यवंशी, अशिष पडघणे, संतोष जमधाडे (नाथा), सुशांत बाळूचपाईकराव, ओमकार भोकरे यासह २० ते २५ आरोपीवर मारहाणीसह दहशत निर्माण करणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गुठे हे करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याकरीता पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान गुरुवारी सकाळपासुन मिलन चौक, शेवाळा रोड, धार्मिक स्थळ, बसस्थानक व इतर पाच-सहा ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस अप्पर अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दुपारी बारा वाजता परिस्थिती आढावा घेत विविध भागात भेट दिली. दरम्यान पोलीस प्रशासनाने परीस्थिती नियंत्रणात असून कोणीही सोशल मीडिया व इतर माध्यमातून अफवा पसरू नये कोणी अफवा पसरवताना आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
रात्री झालेल्या वादानंतर दगडफेक झाली यात घर व (Akhara Balapur Crime) दुकानासमोर उभ्या आसलेले एक कार व चार ऑटो इतर वाहनांच नुकसान झाले. पोलिसांनी रात्री सदर वाहन पोलीस स्थानकात नेउन लावली होती.