मंगरुळपीर (Washim):- पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कासोळा येथील २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तालुक्यातील चिंचखेडा – कासोळा येथे गावातील एकेरी रस्त्यावर असलेल्या पूलावर ही घटना घडली.
दुचाकी बंद पडून थांबली आणि पुरात पडली
प्राप्त माहितीनुसार, कासोळा येथील प्रतीक्षा सुरेश चव्हाण ही वडिलांसोबत 16 जुलाई रोजी वाशिम तालुक्यातील देवगाव येथे मामाच्या घरी जेवणासाठी गेली होती. सायंकाळी घरी परतत होते. वडील व मुलगी दोघेही दुचाकीवरून घराकडे जात असताना, चिंचखेडा ते कासोळा या दरम्यानचा छोटा पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. परिणामी, दुचाकी (Motor Cycle)बंद पडून थांबली आणि पुरात पडली. बाईकसह (Bike)दोघेही वाहून गेले. या घटनेत वडिलांनी मात्र झाडाला धरून आपला जीव वाचवला. पण मुलगी दोन किलोमीटरच्या पुढे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. ही घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस (heavy rain) पडत होता. तेव्हा तेथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. तरी देखील सुरेश चव्हाण यांनी आपल्या मुलीचा नदीकाठी शोध घेतला.
ती नदी किनारी बेशुद्ध अवस्थेत आढळली
मात्र, कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी चिंचखेडा गाठून गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळ भोपाळ पेंड पुलावर शेकडो लोक जमा झाले. तीन तास शोध घेतल्यानंतर ती नांदगाव येथे नदी किनारी बेशुद्ध(unconscious) अवस्थेत सापडली. तिला तात्काळ वाशिम येथे रुग्णालयात(Hospital) नेले असता, डॉक्टरांनी(Doctors) तिला मृत घोषित केले. प्रतिक्षाच्या मृत्यूमुळे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.