हिंगोली (Electricity theft) : सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द येथे महावितरणच्या लघूदाब वाहीनीवर आकडे टाकुन वीज चोरी (Electricity theft) केल्याने सेनगाव पोलिसात २३ आकडे बहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वीज वितरण कंपनीचे अभियंता एस.बी. वडगावकर व त्यांचे कर्मचारी बर्डे यांनी दिनांक २५ जानेवारी रोजी (Electricity theft) वीज चोरी प्रकरणात गजानन सुदामा खिल्लारे, रमेश बाजीराव जाधव, राजाराम संपत खरसडे, दिपक जयवंतराव तायडे, भारत लक्ष्मण जाधव, झनक कचरू मानमोठे, संजय शेषराव जाधव, भिकाराव निवृत्ती जाधव, नामदेव काशिबाराव जाधव, विठ्ठल कळनू जाधव, महादेव दत्ताराव सुतार, जगदिश नागोराव सरनाईक, प्रकाश परसराम जाधव, प्रभाकरराव बापुराव तायडे, गोपाल प्रकाश जाधव, शिवाजी उत्तमराव जाधव, प्रसाद बापुराव सावंत, गजानन भास्करराव जाधव, मनोहर दत्तराव जाधव, दिलीप तुळशिराम जाधव, मधुकर उकंडी झिंझाडे, दत्तराव लक्ष्मणराव जाधव, गजानन निवृत्ती गवळी रा केंद्रा खु. या २३ आकडेबहाद्दरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी महावितरणाच्या लघूदाब विद्युत वाहीनीवर महावितरणची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आकडे टाकुन वीज चोरी केली होती.
सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी
सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी (Electricity theft) होत असल्याने महावितरण कंपनीकडून कारवाई केली जात आहे. यापूर्वी कडोळी येथेही महावितरणच्या पथकाने छापा मारून काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.