परभणी (Parbhani) :- जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक -जावक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने (Heatstroke) सोमवार १४ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. मृतक तरुण हा का्रदबाद प्लॉट येथील रहिवाशी होता.
तरुण परभणीच्या काद्राबाद प्लॉट येथील रहिवाशी
समीर खान लाल खान (वय २४ वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रविवार १३ एप्रिल रोजी दुपारपर्यंत समीर हा जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज करत होता. सायंकाळच्या सुमारास तो घरी गेला. प्रकृती अस्वस्थ जाणवत असल्याने समीरला जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला आयसीयु मध्ये हलविण्यात आले. मात्र समीरच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास समीरची प्राणज्योत मावळली. उष्माघाताने समीरचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिंतूर रोडवरील स्मशानभूमीत (Cemetery) दफनविधी करण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, चार महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. समीर खान हा कंत्राटी तत्वावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होता. तरुणाच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.




