हिंगोली(Hingoli):- सेनगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्यातरी वाहनातून निर्दयीपणे बैलांना वागणूक दिल्याने 25 25 गोवंश जनावर मृतावस्थेत आढळून आल्याने सेनगाव पोलिसात अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला.
25 गोवंश जनावरे मृता अवस्थेत
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा ते येलदरी रस्त्यावर कोणीतरी अज्ञात आरोपीने रात्रीच्या सुमारास बैलांना निर्दयतीची वागणूक देऊन मृत (Dead) झालेले 14 बैल अज्ञात वाहनातून वेगवेगळ्या ठिकाणी आणून टाकले. तसेच मागील तीन ते चार दिवसांपूर्वी आमदरी गावच्या शिवारातही वनविभागाच्या जमिनीत 14 गोवंश जनावरे मृतअवस्थेत आणून टाकल्याचे 16 सप्टेंबरला दिसून आले या प्रकरणात अज्ञात आरोपीने 25 गोवंश जनावरे मृता अवस्थेत आणून टाकल्याने सेनगाव पोलीस ठाण्यात 16 सप्टेंबरला पवन चाटसे यांनी दिलेल्या फिर्यादी अज्ञात आरोपीवर प्राण्यांना कृरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जी कांबळे हे करीत आहेत.