कारंजा(Washim) :- एका 25 वर्षीय युवकाला माकडाने (Monkey) चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी 4 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताचे सुमारास पसरणी शेत शिवारात घडली. मोहम्मद सलीम मोहम्मद इशाख असे माकडाने चावा घेतलेल्या युवकाचे नाव असून, तो कारंजा शहरातील अस्थाना परिसरातील रहिवासी आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मोहम्मद सलीम एका शेतात काम करीत असताना त्याला अचानकपणे एका माकडाने चावा घेतला. त्यामुळे तो गंभीर जखमी (Injured)झाला. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.