श्री हव्याप्र मंडळ येथे दाेन दिवसीय राज्य अजिंक्य जिम्नॅस्टिक स्पर्धा
अमरावती (Gymnastics competition) : जागतिकस्तरावर लाैकीक असलेल्या जिम्नास्टीक खेळांमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जिम्नास्टीक पटूंनी एक स्वतंत्र अशी ओळख राष्ट्रीयस्तरावर निर्माण केली आहे. राज्यासह जिल्ह्यातील जिम्नास्टिक खेळाडूंना राष्ट्रीयस्तरावर एक सक्षम व्यासपीठ मिळाले याकरीता दरवर्षी प्रमाणे यंदाही मंडळाच्या अनंत क्रीडा मंदीर येथे १९ वी ट्रॅम्पोलिन व टम्बलिंग जिम्नास्टीक राज्य अजिंक्य स्पर्धा २०२४-२५ चे दाेन दिवसीय आयाेजन दि.१४,१५ डिसेंबर २०२४ दरम्यान करण्यात येत आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, महाराष्ट्र हाैशी जिम्नास्टीक संघटना, अमरावती जिल्हा हाैशी (Gymnastics competition) जिम्नास्टीक संघटना, मंडळाचे डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१४ डिसें. २०२४ राेजी सकाळी १० वा. मंडळाच्या जिम्नास्टीक विभाग, अनंत क्रीडा सभागृह येथे उद्घाटन पार पडणार आहे. मंडळाचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयाेजीत या उद्घाटन साेहळ्याला अध्यक्ष म्हणुन अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष व श्री हव्याप्र मंडळाचे सचिव प्रा. रवींद्र खांडेकर उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी मध्ये मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे महाराष्ट्र राज्य हौशी संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष, स्पर्धा संचालक पवन भाेईर, संघटनेचे सचिव मकरंद जोशी, कोषाध्यक्ष आशिष सावंत मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांतराव चेंडके, कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, कोषाध्यक्ष प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. डाॅ. विकास काेळेश्वर, प्रा. राजेश पांडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक योगेश शिरके मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जिम्नॅस्टिक विभाग प्रमुख प्रा. आशिष हाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन दिवसीय राज्य अजिंक्य जिम्नास्टीक स्पर्धेमध्ये (Gymnastics competition) राज्यातील २५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. शिवाय ५० पंच, संघ व्यवस्थापक स्पर्धेची जबाबदारी सांभाळणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वितेकरिता जिम्नॅस्टिक विभागाची चमू अथक परिश्रम घेत आहे.