कन्हान (Stealing Raw Sand) : नागपुर जबलपुर महामार्ग क्र ४४ वरील चंपा आश्रम सामोर डुमरी स्टेशन येथे नागपुर च्या दिशेने १२ चाकी टिपर ट्रक मध्ये अवैद्य चोरीची रेतीची वाहतुक करताना कन्हान पोलीसानी ट्रक पकडुन २६ लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीना पकडुन तिन आरोपीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
रात्री ९.५० ते १०.४५ वाजता दरम्यान कन्हान पोलीस पेट्रोलिंग करित असताना नागपुर जबलपुर महामार्ग क्र ४४ वरील चंपा आश्रम सामोर डुमरी स्टेशन येथे नागपुर च्या दिशेने १२ चाकी टिपर ट्रक क्र. एम.एच.४० सि. टी.३०८१ अशोक लेलैंड कंपनीच्या ट्रकवर हिरवा कापड बांधुन जाताना दिसल्याने पोलीसांना शसंय आल्याने टिपर ट्रक थांबवुन पाहणी केली असता ओहर लोड रेती ४६.३९६ टन भरून दिसल्याने (Stealing Raw Sand) रेती चा परवाना नसताना अवैद्य चोरीची रेतीची वाहतुक करताना कन्हान पोलीसानी ट्रक पकडुन ट्रक चालक आकाश बाजीराव टोहने वय २९ वर्ष रा. सिंगारदिप ता. पारशिवनी व क्लीनर प्रविण हरिकिशन शेंडे वय २८ वर्ष रा. मोहाडी ता. मौदा या दोघाना विचारले.
त्याने सदर टिप्पर मालक शुभम ओमप्रकाश शर्मा, रा. रायपुर हिंगना, नागपुर यांचे मालकीचे असुन त्यांचे सांगितलेवरुन १२ चक्का टिप्पर क्र एमएच.४० सि.टी ३०८१ मध्ये गोंदीया येथुन डोंगुर्ली रेती घाटा वरुन रामटेक मार्गे नागपुर येथे रेती भरुन नेत असल्या चे सांगितल्याने कन्हान पोलीसानी घटनास्थळी पंच नामा करून सदर ट्रक किमत २५,०००, ०० रू व त्यातील रेती ४६.३९६ टन किमत १, ०००,०० रू असा एकुण २६,०००,०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोस्टे ला फिर्यादी सरकार तर्फे पोहवा गुरुप्रकाश परसराम मेश्राम यांचे तक्रारीवरून आरोपी ट्रक चालक आकाश बाजीराव टोहने वय २९ वर्ष रा. सिंगारदिप ता. पारशिवनी व क्लीनर प्रविण हरिकिशन शेंडे वय २८ वर्ष रा. मोहाडी ता. मौदा आणि मालक शुभम ओमप्रकाश शर्मा रा.रायपुर हिंगणा, नागपुर विरूध्द अप क्र.१३२/२०२६ कलम ३०३(२), ४९, ३(५) बि.एन.एस. सहकलम ४८(७), ४८(८) महा. ज. मह.अधि.सहकलम ४,२१ खान व खनिज अतिरिक्त. सहकलम ३ सार्व. नुकसान अधिक.अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई थानेदार वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात पोहवा जयलाल सहारे, पोहवा गुरुप्रकाश मेश्राम, पो हवा रोशन देवतळे, चालक पोशि आशिष बोरकर आदीनी यशस्विरित्या पार पाडली.




