गडचिरोली/कुरखेडा (Gadchiroli):- आज दि.२४ आगस्ट शनिवार रोजी सकाळी ७ वाजेचा सूमारास येथील जिल्हा परिषद (Zilla Parishad) कन्या शाळेचा संरक्षण भिंतीजवळील कचाटात एका २६ वर्षीय युवतीचा शव मृत(Dead)स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार मृतकाची ओळख ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम २६ वर्ष अशी आहे.
कुरखेडा शहरात खळबळ जनक घटना
आज सकाळी येथील जिल्हा परिषद आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या मूलाना संरक्षण भिंतीला लागून कचाटात युवतीचा शव दिसला. याची माहीती शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व कुरखेडा पोलिस स्टेशनचे (Police station)ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळाकडे धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा करुन युवतीचा शव ताब्यात घेवून येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका कश्यामुळे झालं हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम (Post mortem) नंतरच स्पष्ट होईल.
मृतकच्या आई च्या म्हणण्यानुसार काल रात्रो मृतक १० वाजताच्या दरम्यान घराबाहेर गेली होती. ती उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता मिळाली नाही. काही दिवसा पूर्वी एका दुर्घटनेत तिच्या भावाचे अपघाती निधन झाले होते.आणि आता मुलगा गमावलेल्या आई वर या घटनेने दूखाचा डोंगर कोसळला आहे.मृतक ही आपल्या आईसह कूरखेडा येथेच राहत कबाडी साहित्य गोळा करीत विक्रीचे काम करीत होती.