परभणी(Parbhani):- जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई (police constable) आणि चालक यांच्या रिक्त पदासाठी बुधवार १९ जून पासून भरती प्रक्रिया सुरू आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Agricultural University) अश्वमेध या मैदानावर मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार २७ जून रोजी पोलीस भरती प्रक्रियेसाठी ५६९ उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३६३ उमेदवार भरतीसाठी हजर झाले. शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र पडताळणीनंतर २८८ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले. त्यांची चाचणी घेण्यात आली.