मानोरा(Washim):- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना महालक्ष्मी योजनेअंतर्गत ३ हजार रुपये महिन्याचे खात्यात जमा केले जाणार आहे. तसेच सोयाबिनला (Soybean) ७ हजार व कापसाला प्रति क्विंटल भाव देऊन युवकांची नौकरी राज्याबाहेर जाऊ देणार नाही. असे सांगत डी सी एम – १ यांच्यावर निशाणा साधत राज्य सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. त्या मंगळवारी कारंजा येथे महाविकास आघाडी रा. का. शरद पवार पक्षाचे उमेदवार ज्ञायक पाटणी यांच्या आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या.
राज्य सरकारच्या धोरणावर कडाडून टीका
यावेळी व्यापीठावर उमेदवार ज्ञायक पाटणी, खासदार संजय देशमुख, माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी आ. अनंतकुमार पाटील, संदीप बाजोरिया, राम डोरले, डॉ श्याम जाधव, माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील, माजी खा. हरिभाऊ राठोड, पांडुरंग ठाकरे, ज्योतीताई गणेशपुरे, श्रीधर कानकिरड, सुरेश मापारी, दामु अण्णा इंगोले, डॉ संजय रोठे, ठाकुरसिंग चव्हाण, इफ्तेखार पटेल, अमोल तरोडकर, प्रकाश राठोड, सुधाकर चौधरी, सुनिल जामदार, मुकेश चव्हाण, संजय हेडा, विजय चव्हाण, शरद हांडे, मनोज कानकिरड, काशीराम राठोड, वहिद भाई आदीसह इतरांची उपस्थिती होती. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महायुती सरकारच्या काळात शेतकरी (Farmer)विरोधी धोरण अवलंबिण्यात आले. सुशिक्षित बेरोजगार रोजगारासाठी वणवण भटकंती करीत आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास पोलीस भरती, महागाई, बेरोजगारी यावर अंकुश लावून काम करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले. व महाविकास आघाडीचे उमेदवार ज्ञायक पाटणी यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेकांनी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी फटाक्याची आतिषबाजी व राम कृष्ण हरी व वाजवा तुतारीच्या जय घोषणेने परीसर दुमदुमुन गेला होता.
भाजपाने अनेकांचे घर व पक्ष फोडले
भाजपा पक्षावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपाने अनेकांची घरे फोडली असुन पक्ष सुध्दा फोडले आहे. आमचेही घर फोडून शरदचंद्र पवार यांना खूप त्रास दिला. अश्या अवस्थेत जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेत विजय मिळाला. विरोधक असले तरी त्याचा सन्मान केला पाहिजे, दुर्दैवाने भाजपमध्ये तसे होत नाही. असेही त्या म्हणाल्या.