परभणी/मानवत (Parbhani) :- देशोन्नती वृत्तसंकलन तालुक्यातील रूढी शिवारात मानवत परभणी रस्त्यावर उभ्या असलेल्या हायावा वर पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात (Accident)३१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १७ जून रोजी सकाळी ६ वाजता घडली.
मानवत तालुक्यातील कोल्हा येथील सुरेश आसाराम हरकळ वय ३१ वर्ष हे सकाळी आपल्या दुचाकीवरून मानवत कडे जात असताना परभणी रस्त्यावर कैलास पेट्रोल (PetrolPump) पंपासमोर उभ्या असलेल्या हायवा ट्रक क्रमांक एम. एच. १४ बीजे २५०६ च्या पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात सुरेश हरकळ हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी परभणी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू (Death)झाला. परभणी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन (Autopsy)करण्यात आले.सुरेश हरकळ यांच्या पश्चात पत्नी, एक सहा महिन्याची मुलगी, आई असा परिवार आहे. रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने हरकळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंजाभाऊ हरकळ यांच्या तक्रारीवरून हैवा ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.