थर्टी फर्स्ट च्या पृष्ठभूमीवर हिंगोली जिल्ह्यात वाहन चालक तळीरामावर उपसला कारवाईचा बडगा
हिंगोली (31st Party) : थर्टीफस्ट निमित्ताने ड्रंक अँन्ड ड्राईव्हसह अन्य गैरप्रकारावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या निमित्ताने जिल्हाभरात अनेक ठिकाणी वाहन तपासणीद्वारे ब्रेथ अनाॅलायझर यंत्र (मद्यपानाच्या प्रमाणाची चाचणी घेणारे यंत्र) याद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये काही मद्य चालक आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात हॉटेल्स, लॉन्स व हायवेवरील ढाब्यांवर पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी, पार्ट्यांचा विचार करून जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासोबच फिक्स पॉईंट, गस्त वाढविण्यात आली आहे. (31st Party) थर्टी फस्ट निमित्ताने अनेक वाहन चालक मद्य सेवन करून वाहन चालवित असतात अशा मद्यपी चालकावर कारवाई करण्याकरीता हिंगोली जिल्ह्यात ३२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात आहे. २९ डिसेंबर पासूनच या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.
ब्रेथ अनाॅलायझर मशिनद्वारे प्रत्येक वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी मद्यपी वाहन चालक आढळून येत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. शहरातील प्रमुख मार्गासह महामार्ग व जिल्हा हद्दीत येणाऱ्या रस्त्यावर देखील पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले असून त्यांच्याजवळ ब्रेथ अनाॅलायझर यंत्र देण्यात आले आहे.
बंदोबस्तासाठी अनेकजण सज्ज
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, ५५० होमगार्ड, १ एसआरपी कंपनी, ७५० पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहे.
नववर्षाचे स्वागत सर्वांनी आनंदात व उत्साहात साजरे करावे: पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नववर्षाच्या स्वागताकरीता अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत; परंतु सर्वांनी या (31st Party) आनंदाचा उत्सव जबाबदारीने साजरा करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील हॉटेल्स, ढाबा चालकांनी अवैधरित्या दारू विक्री करू नये, कुठेही असा प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.