पुसद (Pusad):- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बारा चाकी ट्रकच्या धडकेत 32 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू (unfortunate death) झाल्याची घटना दि. 2 जुलै रोजी सकाळी अंदाजे 9 वाजताच्या दरम्यान घडली. अत्यंत मनाला वेदनादायक दृश्य पटनास्थळी दिसत होते.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा गराडा
प्राप्त माहितीनुसार, मृतक सतीश नारायण जाधव वय 32 वर्ष रा. छत्रपती शिवाजी महाराज वार्ड हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नेताजी सुभाष चंद्र बोस चौककडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाशिष लॉज जवळ सतीश नारायण जाधव यास बारा चाकी ट्रक क्रमांक एम एच 29 t 22 88 ची जबर धडक (hit hard) लागली. या धडकेत सतीश याच्या छातीला तसेच डोक्याला जबर मार लागला व उजवा हात तुटला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यास उचलून एका खाजगी रुग्णालयात (Private hospital)दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यास तपासले त्यास मृत (Dead)घोषित केले. सद्यस्थितीत मृतक सतीश नारायण जाधव यांचा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता(Autopsy) आणण्यात आला आहे. मृतकाच्या भावामार्फत शहर पोलीस स्टेशन येथे ट्रक चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतक सतीश याच्या पश्चात दोन लहान भाऊ एक बहीण आणि आई-वडील असा आप्त परिवार आहे. घरातल्या मोठ्या मुलाचे अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.
ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले
छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक(Illegal passenger transportation) करणाऱ्या वाहनांचा गराडा राहत असल्यामुळे अशा अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. तर मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा इन्शुरन्स(Insurance) ही 12 जून रोजी संपल्याची माहिती मिळत आहे, शहर पोलीस ठाण्यात संबंधित ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार यांच्या सूचनेनुसार शहर पोलीस करीत आहेत. “