समितीचे अध्यक्ष रामेश्वर मोकाशे यांची माहिती
परभणी/सोनपेठ (Sanjay Gandhi Niradhar Yojana) : येथील तहसील कार्यालयात गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar Yojana) समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये ३२१ अर्ज मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रामेश्वर मोकाशे व सचिव तहसीलदार सुनील कावरखे यांनी दिली.
सोनपेठ तहसिल कार्यालयात बैठक पार
सोनपेठ तहसील कार्यालयात (Sanjay Gandhi Niradhar Yojana) संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव दाखल केले होते. ते प्रस्ताव निकाली काढण्यासाठी गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक समितीचे अध्यक्ष रामेश्वर मोकाशे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी सचिव तहसीलदार सुनील कावरखे, सदस्य गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, नगरपालिका प्रतिनिधी, शिवाजी मव्हाळे, भास्कर बचाटे, मारुती रंजवे, मदन सपकाळ, चंद्रकांत कानडे, छाया शिंगाडे, उत्तम राठोड, यांची उपस्थिती होती.
तर संजीवनी मोरे, मधुकर निरपणे हे हजर नव्हते. यावेळी अपात्र लाभार्थ्यांनी त्यांचे बँक पासबुक, हयात प्रमाणपत्र, आधार कार्डाची प्रत तहसिल कार्यालयात (Sanjay Gandhi Niradhar Yojana) संजय गांधी विभागात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सोनपेठ तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, सामाजीक कार्यकर्ते यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज आपल्या तलाठी सज्जात तात्काळ दाखल करण्याचे आवाहन केले आहे.