मानोरा(Washim):- तालुक्यातील गिरोली येथे दि. १२ ऑगस्ट रोजी कत्तली साठी(slaughter) नेली जात असलेली ३३ जनावरे पोलिसांनी पकडली असून ती जनावरे येथील लक्ष पार्वती गो-शाळेत सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आली आहे.
या बाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समजते , त्याची माहिती बीट जमादार कडून घ्यावी असे सांगीतले जाते, मात्र बिट जमादार राऊत यांना सपंर्क केला असता प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कोणत्या आरोपी विरुद्ध, कोणता गुन्हा दाखल (Filed a case)झाला हे स्पस्ट होऊ शकले नाही. ही जनावरे कोठून कोणी आणली होती याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यात येत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे.