शेकडो नागरिकांचे प्राण आले होते धोक्यात
सेनगाव (Power supply) : येथील ३३ केव्हीचा जीर्ण तार अचानक तुटून एका व्यक्तीच्या गळ्यात पडला. या घटनेतील सदरील व्यक्तीस विजेचा जबर धक्का लागल्याने त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. संबंधित दवाखान्यातील डॉक्टरने या व्यक्तीस तपासून मृत घोषित केले मात्र नातेवाईकांनी , नागरिकांनी सदरील व्यक्तीस सरकारी दवाखान्यात घालवल्यानंतर तिथे मात्र या व्यक्तीस पंपिंग दिल्यानंतर हा व्यक्ती जिवंत असल्याचे निदर्शनास आले. तात्पुरता उपचार करून व्यक्तीस हिंगोली येथील हॉस्पिटलला रेफर केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
सेनगाव येथील ३३ केव्ही विद्युत पुरवठ्याची तार तुटण्याची ही वर्षातील दुसरी घटना असून गलित गात्र झालेल्या येथील महावितरणच्या संबंधित अधिकार्यांना आणि प्रशासनाला याचे काहीच गांभीर्य आणि सोयरसुतक नसल्याचे दिसते. घटनेतील पीडित व्यक्ती ही सेनगाव तालुक्यातील कवठा येथील रहिवासी आहे. राजे खा पठाण असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मुलाचे सेनगाव येथे मोबाईल रिपेरिंग व ऑटोमोबाईल चे दुकान आहे. राजे खा पठाण हे ७ डिसेंबर रोजी एका लग्नावर आले होते. लग्नातून ते त्यांच्या मुलाच्या मोबाईल रिपेरिंग व ऑटोमोबाईलच्या दुकानावर जाऊन त्यास भेटून कवठा या गावी परत जात होते. ते गावी परतत असताना सेनगाव येथील भेटीत गेली उपकेंद्राचा जीर्ण झालेला विद्युत पुरवठ्याचा तार अचानक तुटून राजे खा पठाण यांच्या गळ्यात आला. या घटनेत राजे खा पठाण यांना विजेचा जबर धक्का लागला असता त्यांना सेनगाव येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले असता दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मात्र राजे खा पठाण यांच्या मुलाने आणि त्यांच्या मित्रमंडळीने तसेच नातेवाईकांनी त्यांना सरकारी दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी पंपिंग दिल्यानंतर ते जिवंत असल्याचे निदर्शनास आले व त्यांना हिंगोली येथे रेफर करण्यात आले होते. पण दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सेनगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे विद्युत पुरवठ्याचे तार मागील अनेक वर्षांपासून जुने झाले आहेत ते कित्येक महिन्यांपासून बदलण्यास आलेले असताना देखील महावितरण आणि संबंधित विभागातील प्रशासन मात्र जुण्या तारांवरच आपला व्यवसाय थाटत आहेत. त्यामुळे सेनगाव नगर वाशीयांसह शहरात येणार्या खेडेगावातील ग्रामस्थांचा तसेच नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ३३ केव्ही उपकेंद्राचा विद्युत पुरवठ्याची तार तुटण्याची ही दुसरी वेळ असून ती एका व्यक्तीच्या जीवावर बेतली आहे . आत्ता तरी महावितरणच्या प्रशासनास जाग येतो का असा सवाल नागरिकातुन उपस्थित होत आहे.
एकाच्या मोटर सायकलच्या टायरने ही घेतला पेट
बस स्टँड समोरील जगदंबा इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाची दुचाकी ही दुकान समोर उभी केली असता ३३ केव्ही चितार त्यांच्या दुचाकीच्या टायरवर आदळल्यामुळे अचानक टायरने पेट घेतला. शेकडो व्यक्तींच्या मधात अचानक पडलेल्या या तारेमुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले होते पण सुदैवाने कुठलीही मोठी घटना घडली नाही.