परभणी (Agricultural Solar Pumps) : शेतकर्यांना शेती सिंचनासाठी हक्काची वीज मिळावी या करीता सौर कृषीपंप वरदान ठरत आहेत. मागेल त्याला कृषीपंप या योजनेने राज्यातील एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा ओलांडला आहे. परभणी जिल्ह्यात ९ हजार ३३४ शेतकर्यांना (Solar Pumps) सौर कृषीपंपाचा लाभ मिळाला आहे.
केवळ दहा टक्के रक्कम भरुन सौर वीज निर्मिती पॅनल व कृषीपंप असा संपूर्ण संच शेतकर्यांना देण्यात येतो. शेतकर्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी योजना प्राधान्याने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Solar Pumps) सौर कृषीपंप योजनेत राज्याने आघाडी घेतली आहे. ११ डिसेंबर पर्यंत १ लाख १ हजार ४६२ सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत.
यामध्ये परभणी जिल्ह्यात ९ हजार ३३४ पंप बसविण्यात आले आहेत. राज्य शासनाने अर्थसंकल्पात सदर याजनेची घोषणा केली होती. साडे दहा लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कृषीपंपासाठी पैसे भरुन वीज कनेक्शनची प्रतिक्षा करणार्या सर्व शेतकर्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे. या योजने शेतकर्यांना प्रधानमंत्री कुसूम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. केवळ १० टक्के रक्कम भरुन सिंचनासाठी कृषीपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकर्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. सौर पॅनलमधून २५ वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकर्यांना कृषीपंपाचे वीज बिल येत नाही.
हे पंप पारंपारिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकर्यांना त्यांच्या मर्जी प्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकर्यांची मागणी पूर्ण होते. नियमित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकर्यांसमोर शेमती सिंचनाचा मोठा प्रश्न उभा टाकतो. (Solar Pumps) सौर कृषी पंपाद्वारे शेतकर्यांना शाश्वत वीज पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेने लाभार्थ्यांचा एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. शेतकर्यांना सौर कृषीपंपाचा लाभ होत आहे.
सौरपंपाद्वारे शाश्वत वीज पुरवठा
शेतकर्यांसाठी सौरकृषी पंप वरदान ठरत आहे. ग्रामीण भागात नियमित वीज नसल्याने शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो. (Solar Pumps) सौर कृषी पंपाद्वारे शेतकर्यांना नियमित वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे सौरपंपाकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे.