पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण दिन ..!
परभणी (Special Campaign) : पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून शनिवार ११ जानेवारी रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या (Special Campaign) विशेष मोहिमेत परभणी जिल्हा पोलीसांकडून ३३५ तक्रार अर्जांचा निपटारा करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन स्तरावर एकाच दिवशी (Special Campaign) विशेष मोहिम राबविण्यात आली. शासनाकडून, वरिष्ठ अधिकारी कार्यालय तसेच स्थानिक स्तरावर प्राप्त अर्ज निकाली काढण्यात आले. तक्रार अर्जातील अर्जदार यांना पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष बोलावून त्यांनी दिलेल्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, १९ पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त तपास अधिकारी, अंमलदार यांनी मोहिमेत सहभाग घेतला.