परिक्षेला २९ विद्यार्थी गैरहजर
हिंगोली (Scholarship Exam) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२४-२५ करीता २२ डिसेंबर रोजी बौद्धिक क्षमता चाचणी परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये एकूण ३७८८ पैकी ३७५९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते तर २९ विद्यार्थी गैरहजर होते.
एनएमएमएस परिक्षेतून शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार रूपये (Scholarship Exam) शिष्यवृत्ती मिळत असते. आठवीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा आयोजित केलेली असते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रूपयापेक्षा कमी असलेल्या पालकांची मुले या परिक्षेकरीता पात्र ठरत असतात. त्यानुसार जिल्ह्यातील ३७८८ विद्यार्थी परिक्षेला पात्र ठरले होते.
२२ डिसेंबर रविवार रोजी १४ परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० ते दुपारी १२ दरम्यान बौद्धिक क्षमता चाचणी परीक्षा (Scholarship Exam) घेण्यात आली. एकूण ३७८८ पैकी ३७५९ विद्यार्थी परिक्षेला उपस्थित होते. २९ विद्यार्थी परिक्षेला गैरहजर होते. या परिक्षा सुरळीत पार पाडण्याकरीता जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर, नितीन नेटके, विनोद करंडे, आकाश बांगर यांच्यासह पाचही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालकांनी परिश्रम घेतले.